`या` अभिनेत्याने चित्रपट नाकारला आणि गमावले 1400 कोटी; आता हिरो म्हणून कोणी घेईना
This Actor Rejected Avatar: अवतार चित्रपट हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. मात्र, एका अभिनेत्याने हा चित्रपट नाकारला होता.
Actor Matt Damon: अनेकदा कलाकारांना एखाद्या चित्रपटाला नकार देणं खूप महागात पडतं. त्या निर्णयाचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो. एका हॉलीवूड कलाकारांसोबतही असंच काहीसं घडलं आहे. त्यांने पंधरा वर्षांपूर्वी एका चित्रपटाला नकार दिला. मात्र या चित्रपटाना नकार देऊन त्यांनी खूप मोठी चूक केल्याचं त्याचं म्हणणं आहे. या चित्रपटाला नकार दिल्यामुळं त्याला तब्बल 1400 कोटी गमवावे लागले आहेत. कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया.
तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच की कमी फी असल्यामुळं अभिनेते वा कलाकार चित्रपटासाठी नकार देतात. मात्र इथे तर एका अभिनेत्याला तब्बल 1400 कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले होते. मात्र तरीही त्याने या चित्रपटाला नकार दिला. मात्र जेव्हा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहून अभिनेत्याला पश्चात्ताप झाला. या अभिनेत्याचे नाव मॅट डॅमन असं आहे. मॅट डॅमन यांने फक्त 10 मिनिटांत 1400 रुपये गमावले होते.
जेम्स कॅमरुन त्यांचा लोकप्रिय चित्रपट अवतारसाठी मॅटला मुख्य भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. त्यासाठी त्याला मोठ्या रकमेची फीदेखील देण्याचे सांगितले होते. मात्र, मॅटने हा चित्रपट नाकारला. मॅटला आजही अवतार चित्रपटाला नकार देण्याच पश्चात्ताप होतोय. त्याने एका मुलाखतीतदेखील याचा खुलासा केला आहे. त्याने म्हटलं आहे की, मला अवतार चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं. मात्र मी तेव्हा नकार दिला होता. जेम्स कॅमरून यांनी मला फोन केला होता. तेव्हा म्हटलं होतं की, अवतारच्या प्रॉफिटमधील 10 टक्के हिस्सा फी म्हणून मला देण्यात येईल.
मॅड डॅमनने पुढे म्हटलं आहे की, तुम्ही आजपर्यंत अशा कोणत्या अभिनेत्याला भेटले नसाल ज्याने सर्वाधिक पैशांची ऑफर धुडकावली असेल. मॅडने अवतार नाकारल्यानंतर या चित्रपटासाठी सॅम वर्थिगटनला मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, अवतार प्रदर्शित झाल्यानंतर जगात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.
जॅम्स कॅमरुनच्या अवतार चित्रपटाने जगभरात जवळपास 2.9 बिलियन डॉलरची कमाई केली होती. त्याने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. जर मॅट डॅमनने अवतार चित्रपट स्वीकारला असता तर त्याला 2.9 बिलियन डॉलरचे 10 टक्के म्हणजे 290 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांनुसार 1400 कोटी रुपये मिळाले असते.
एका रिपोर्टनुसार, मॅट डॅमनने फक्त 10 मिनिटांतच हा चित्रपट नाकारला होता आणि 1400 कोटी रुपये गमावले होते. एका माहितीनुसार, सॅम वर्थिंगटनला अवतारच्या कमाईचा पाच टक्के रक्कम मिळाली होती.
मॅट डॅमेनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 1992मध्ये चित्रपट Geronimo मधून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात लहान-लहान भूमिका साकारल्या. ओशन इलेव्हन आणि बोर्न या सीरीजमधील भूमिकांमुळं त्याला ओळखलं जातं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याचे करिअर थोडे डळमळीत झाले आहे. तो इंटरस्टेलर आणि ओपनहायमर सारख्या चित्रपटात कॅमियो म्हणून काम केले होते.