मुंबई : गेल्या काही महिन्यात इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी कोणत्या न कोणत्या मार्गाने समोर येत राहिल्या. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मौनी रॉयने बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही झाले आहेत. मौनीबद्दल सांगायचं झालं तर ती कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. पण तिचे आता अभिनेत्रीने जी पोस्ट केली आहे, त्यामुळे ती चर्चेत आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मौनी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मौनीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या पतीला मिस करत आहे. तसेच फोटो शेअर करून मौनीने सूरजला लवकरच तिच्याकडे येण्यास सांगितले आहे.



 मौनीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. मौनीने तीन फोटो शेअर केले आहेत. सध्या तिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. मौनीसध्या तिच्या आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे...


याशिवाय मौनी लवकरचं 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. मौनी रॉयच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, टीव्हीशिवाय ती बॉलिवूडमध्येही खूप सक्रिय आहे. याशिवाय मौनीने नागिन 1, नागिन 2 आणि नागिन 3 मध्ये तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.