मुंबई : दादा ब्रह्मे आणि शशी बिराजदार हे कॅालेज काळातले जुने वैरी येणार समोरासमोर! शशी बिराजदार चं खरं नाव बब्या बिराजदार, पूर्वीचा गुंड आणि स्मगलिंगवाला, जो दादा ब्रह्मे सोबत एकाच कॅालेजात असतो, आणि तेव्हापासून हुशार दादा आणि गुंड बब्या ह्यांचं वैर असतं. त्यापायीच दादाने कॅापी करताना बब्याला पकडून दिलेलं असतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आदित्य आणि सई चा प्रवास आता लग्नाच्या दिशेने सुरु झालाय, सुयश शी सई ठरलेलं लग्न मोडावं ह्या हेतूने, सगळे मामा बिराजदारांकडे येतात, पण तिथेच एकमेकांचे जुने वैरी असणारे दादा ब्रह्मे आणि शशी उर्फ बब्या बिराजदार समोरासमोर येतात. आता ह्या जुन्या हाडवैऱ्यांमुळे सई आदित्यच्या लग्नात विघ्न तर येणार नाही ना? पहात रहा, माझा होशील ना रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.



सई-आदित्यचं लग्न हे सध्या महत्वाचं असलं. तरीही अनेक विघ्न या लग्नात येताना दिसत आहेत. अनेक अडथळे पार करत आतापर्यंत सई आणि आदित्य लग्न करत आहेत. पण दादा आणि बिराजदार यांच्यातील जुनं वैर या दोघांच्या लग्नात विघ्न तर आणणार नाही ना? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.