मुंबई: माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या माया अर्थातच रुचिराचे फोटो सोशल मीडियावर सध्या धूमाकूळ घालत आहेत. तिच्या अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अदांमुळे चाहते पुरते घायाळ झाले आहेत. रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीवरील सीरियलमध्ये मायाची भूमिका साकारली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुनाथ सुभेदारच्या प्रेमात पडलेली माया आणि बिझनेसचं कौशल्य अशा दोन्ही टप्प्यात तिने साकारलेली ही भूमिका सर्वांनाच आवडली होती. यापूर्वी रुचिराने लव्ह लफडे या विनोदी मालिकेतही काम केलं आहे. 2008 मध्ये रुचिराने चित्रपटात काम केलं होतं. 2012 मध्ये तुझ्या वाचून करमेना, बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती सारख्या सीरियल्समध्ये काम केलं. तर काही मराठी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केलं आहे. 


तु मिला या म्युझिक अल्बममध्ये देखील रुचिराने काम केलं आहे. तिचा फक्त बोल्ड लूकच नाही तर साडीतील फोटोही खूप सुंदर आहेत. माझ्या मित्राची गर्लफ्रेंड फोमो या वेबसीरिजसाठी तिने काम केलं आहे. तिचं सौंदर्यच नाही तर तिने केलेल्या भूमिकाही तेवढ्याच दमदार आहेत. तिचे फोटो चाहत्यांना भुरळ घालणारे आहेत.