मुंबई : झी मराठीची लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका पुन्हा एकदा नव्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. राधिकाने गुरुनाथाच्या कट कारस्थानांना कंटाळून शेवटी आपले सर्व साम्राज्य नवऱ्याच्या हाती देऊन कंपनीच्या कामातून संन्यास घ्यायचा ठरविला आहे. कालचा एपिसोडही असाच रोमांचकारी झाला. राधिकाच्या धास्तीने घाबरलेली शनाया तिला फोन करून माफीची याचना करते परंतु, राधिका तिची विनवणी झिडकारते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आपल्या नवऱ्याच्या खोट्या वागणुकीला वैतागलेली राधिका एकांतात निराशलेली पाहून सरीताने तिच्या निराशेचे कारण विचारले. नंतर, सौमित्र आणि सरीताने राधिकाला डान्स क्लासला जाण्याचा सल्ला दिला. 


तिकडे, कंपनीमध्ये गुरुनाथ अजूनही आपल्या खोटेपणाने कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांची मनं जिंकण्याचे प्रयत्न सुरु ठेवतो. 


ज्यामुळे त्याच्या डोक्यात नक्की काय चालू आहे, हे न कळल्याने सारे कर्मचारी हैराण होतात. दरम्यान, आपल्यावर रुसलेल्या शनायाचा राग दूर कसा करायचा या विचाराने गुंतलेला गुरुनाथ कोणती नवी खेळी खेळणार हे बघण्यासाठी "माझ्या नवऱ्याची बायको" या मालिकेचा पुढील एपिसोड बघायला विसरू नका.