माझ्या नवऱ्याची बायको : गुरुनाथला मिळणार का राधिकाची अपॉईंटमेंट?
अल्पावधीतच लोकप्रिय झालेली झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आता रंजक वळणावर पोहचली आहे.
मुंबई : अल्पावधीतच लोकप्रिय झालेली झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आता रंजक वळणावर पोहचली आहे. गुरुची कंपनी डबगाईला आल्यामुळे त्याला आता राधिकाचे पाय धरण्यावाचून कोणताही पर्याय उरलेला नाही. अशातच राधिकाची मदत घायला तयार झाला आहे. पण राधिका गुरुनाथला भाव देणार का? राधिकाची अपॉईंटमेंट गुरुनाथला मिळणार का?
गृहीणी ते उद्योजिका हा यशस्वी प्रवास केल्यानंतर राधिकाला चांगलाच आत्मविश्वास आला आहे. त्यातच गुरुने दिलेल्या दुःखाची, अपमानाची सल तिच्या मनात कायम आहे. त्याचा बदला तर ती घेणारच. त्यातून आता तिचा जशास तसे हा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.
शनायासोबत साखरपुडा केल्यानंतर गुरुची वाईट वेळ सुरु झाल्याचे राधिकाने म्हटले होते. हे खरं होते की काय, असे वाटू लागले आहे. पण ही वेळ गुरुवर नेमकी कशी येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तुर्तास राधिकाची अपॉईंटमेंट मिळवण्यासाठी सुरु असलेली गुरुची धडपड पहा ZEE5 वर...