मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात गुरु पासून झाली. दुपारच्या जेवणासाठी शनायाला जेवण आणायला गुरु कंपनी बाहेर जातो. समोरच्या वडापाव वाल्याला चार वडापाव बांधायला सांगतो आणि त्याला आईचा फोन येतो. सरीता त्याला त्याची काजळी विचारते आणि गुरु सुरु होतो, राधिकाने माझी पुरी वाट लावली आहे असे सांगतो व म्हणतो आज ती घरी आली की तिला माझ्या मुलाशी कुठल्या जन्माचे वैर काढतेस असा जाब विचार. त्याचे हसे कासावीस बोलणे ऐकून सरीता मनातून भरल्या डोळ्यांनी स्तब्ध होते. दरम्यान शनाया आपल्याच नशिबाला कोसत बसलेली असते. तिला पाहून समिधा खोडकर चिमटे काढून जाते. एवढ्यात गुरु वडापाव घेऊन येतो. दरम्यान सर्व स्टाफला राधिका मिटिंगरूममध्ये बोलावते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिटिंग सुरु असताना भूक अनावर झालेली शनाया मिंटिंगरूममध्येच गुरूने आणलेला वडापाव खात असते. राधिका सर्वांनी मिळून एकत्र कसे काम केले पाहिजे याबद्दल राधिका सर्वांना मार्गदर्शन करते. मिटिंग झाल्यावर वडापाव वरून शनायाला पुन्हा सारे हसतात आणि खिल्ली उडवतात. दुसरीकडे नानी राधिकाच्या वाहवा करीत असतात एवढ्यात बकुळा मावशी आणि रामप्रसाद येऊन नानींना सांगतात आज आपण राधिकाचे जंगी स्वागत करूया. तेवढ्यात श्री सुभेदार सुद्दा तिथे येतात आणि रामप्रसादच्या विचारला दुजोरा देतात. तिकडे आनंद राधिकाला निघूया का असे विचारतो, तेव्हा राधिका त्याला विचारते गुरुनाथ कुठे गेले बराच वेळ दिसले नाहीत. तेव्हा आनंद कडून कळते की तो केव्हाच गेला आहे. चिडलेला गुरु पुढे काहीही करू शकतो असे आनंद राधिकाला सांगतो, तेव्हा राधिका म्हणते बघूच किती खालच्या पातळीला उतरतात ते. मी पण मागे हटणार नाही आता.


दरम्यान दुसरीकडे राधिकाच्या वागण्यामुळे वैतागलेला गुरु सूडाच्या भावनेने पेटून जाब विचारण्याची तैयारी करू लागतो. राधिका घरी गेल्यावर रेवती सौमित्र नाना नानी श्री सुभेदार आणि इतर सारे राधिकाच्या जंगी स्वागत करून आनंदाने नाचू लागतात ते पाहून सरीता मात्र सरीताला राधिकासह सर्वांचीच फार चीड येते. दरम्यान सौमित्र राधिकाला मिठाई भरवणार एवढ्यात गुरु तिथे येतो आणि रागाने सौमित्रच्या हातातील मिठाई हाताने उडवून टाकतो.


राधिकाच्या स्वागताच्या ठिकाणी आलेला गुरु राधिकाच्या सूड घेण्यासाठी कोणत्या प्रकारे धुमाकूळ घालतो हे बघण्यासाठी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.