आईला आपल्या बाजूने वळवणे गुरु-शनायाला होईल का शक्य?
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. शनायासोबत साखरपूडा केल्यानंतर गुरुची सुरु झालेली वाईट वेळ सुरु झाली आहे. आपली डबगाईला आलेली कंपनी वाचवण्यासाठी गुरु अगदी राधिकाच्या हातापाया पडायला ही तयार होतो. चक्क तिची अपॉईंटमेंट घेऊन तिला ऑफिसमध्ये भेटायला जातो. मात्र तिथे गुरुची राधिकाच्या टीमकडून चांगलीच खिल्ली उडवण्यात येते.
मग राधिकासोबत झालेल्या वादावादीत राधिका गुरुकडे घटस्फोटाची मागणी करते. गुरुही त्याला तयार होतो. राधिका-गुरुच्या घटस्फोटाची बातमी ऐकून शनाया एकदम खूश होते. पण ही कसरत वाटते तितके सोपी नाही.
सासूची नाराजी पत्करुन मुलाची काळजी करत अखेर राधिका तिच्या घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम राहते. वकीलांची भेट घेते.
गुरुही वकीलांचा सल्ला घेण्यासाठी शनायासोबत वकीलांची भेट घेतो. पण त्यांची केस खूपच वीक असल्याचे वकील त्यांना सांगतात आणि आई-वडीलांपैकी एकाचा पाठींबा मिळवण्याचा सल्ला त्यांना देतात. मग शनाया केडीची मदत घेते. पण मावशी आणि केडी शनायाला कसे उल्लू बनवणार हे पाहणे गमतीचे ठरणार आहे.
मग या परिस्थिती गुरु-शनाया नक्की काय करणार? आईला आपल्या बाजूने वळवण्याचा गुरु-शनायाचा प्लॅन यशस्वी होणार का? तुम्हीच पाहा...