मुंबई : झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेने वर्षभरात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. साधी भोळी राधिका, नखरेल शनाया आणि ओव्हर स्मार्ट, चापटर गुरु अशा भूमिकांनी रंगलेल्या मालिकेत आता मात्र रंजकता वाढली आहे. कारण आता राधिका स्वावलंबी झाली असून शनाया बिनडोक ठरत आहे. तर ओव्हर स्मार्ट गुरु आता बिचारा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता राधिका-गुरुनाथच्या घटस्फोटाचा महासंग्राम मालिकेत पाहायला मिळत आहे. राधिका, गुरु-शनायावर फारच भारी पडत आहे. पण दोन्ही बाजूने पेचात सापडलेला गुरु काही त्याचा चापटरपणा सोडताना दिसत नाही. त्यातच तो नवी खेळी खेळतो. इमोशनल गेम करुन आईला आपल्या बाजूने वळवतो. आईही मुलाच्या प्रेमापोटी आपले दागिने विकून गुरुला पैसे देते. पण गुरु मात्र आईच्या प्रेमाचा गैरफायदा घेतो. पण गुरुचा हा इमोशनल गेम राधिकाला कळतो. आईकडून घेतलेल्या पैशाचा राधिका गुरुला जाब विचारणार आहे.


पण आतापर्यंत आई-बाबा राधिकाच्या पाठीशी होते. त्यामुळे खंबीरपणे आपले निर्णय घेत होती. पण आई गुरुच्या बाजूने गेल्यावर राधिका पुढे काय करणार? आईंना कसं समजवणार? आईंनी समजून न घेतल्यास राधिका पुढे काय करणार? हे पाहण्यासाठी पाहत राहा, माझ्या नवऱ्याची बायको.