COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात शनाया पासून झाली. शनाया घरी येते तेव्हा तिच्या घर दरवाजा उघडाच असतो, आत गेल्यावर शनायाला कळते की घरी चोरी झाली आहे. दरम्यान कपाटावरून काहीतरी पडते आणि शानया घाबरते. काहीवेळाने शनाया प्रियांकाला फोन करते पण तिचा फोन काही लागत नाही. तेवढ्यात गुरु येतो आणि ती रडायला लागते . गुरुलाही कळते की घरी चोरी झाली आहे. दुसरीकडे राधिका दुपारी घडलेल्या प्रसंगाचा विचार करीत बसलेली असताना तिचा मूड चेंज होण्यासाठी सौमित्र तिला बाहेर घेऊन जातो. 


तेवढ्यात गुरुला सरीता फोन करून सांगते, तू काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी उभी आहे. दरम्यान गुरु केड्याला फोन करून काल त्याने केलेल्या पराक्रमाचे इतिवृत्तांत सांगून टाकतो. गुरुचे बोलणे ऐकून केड्या त्याला राधिकाच्या माफी माग असे सांगतो. पण मी तसे नाही करणार असे केड्याला सांगतो. तेव्हा जशी तुझी मर्जी असे बोलून केड्या फोन ठेऊन देतो. केड्याने सांगितलेल्या गोष्टीचा विचार करून गुरु आपली वाईट अवस्था बदलविण्याची राधिकाच्या माफी मागेल का हे बघण्यासाठी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा पुढील एपिसोड बघायला विसरू नका.