COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात शनाया आणि गुरु पासून झाली. सकाळी दोघेही चहा घेत एकमेकांच्या चुकांवर एकमेकांना सॉरी म्हणून चर्चा करत असतात. एवढ्यात शनाया म्हणते आपल्या परिस्थितीवर थोडीशी मात करण्यासाठी आपण तुझी कार विकूया. पण गुरु तिला नकार देऊन यावर विचार करू असे म्हणतो. तेव्हा गुरु म्हणतो माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. दरम्यान आपले वर्कर उशीरा आल्याने श्रेयस आणि आनंद त्यांची कानउघाडणी करून उद्यापासून वेळेवर यायचे असे सांगतात आणि रश्मीला म्हणतात यांच्या नंतर जे कुणी येतील त्यांची इंट्री घ्यायची नाही असे आनंद सांगतो. तेवढ्यात गुरु आणि शनाया उशीरा ऑफिसात पोहचल्याने आनंद त्या दोघांनाही चांगलेच सुनावतो. आनंद आपल्यावर आवाज चढवून बोलतो आहे ते गुरूला सहन होत नाही आणि तो राधिकाला जाब विचारण्यासाठी तिच्या कॅबिनमध्ये जातो.


कॅबिनमध्ये जाऊन गुरु आपले दोन्ही हात जोडून राधिकाच्या माफी मागतो. ते ऐकून कॅबिनमध्ये बसलेली जेनी बाहेर जाऊ लागते पण, राधिका तिला कॅबिनमध्येच थांबायला सांगते आणि जे काही बोलायचे ते जेनीसमोरच बोल असे गुरुला म्हणते. दरम्यान गुरु मी जे काही व जसा काही वागलो त्यामुळे मला माफ कर असे गुरु म्हणतो, ते ऐकून राधिका म्हणते आता माफी मागण्याची वेळ गेली आहे. त्यावर गुरु म्हणतो एक विनंती आहे, की हा असा वेळोवेळी करीत असणारा माझा अपमान करीत आहेस ते बंद कर व आपले जे काही आहे त्यात शनायाला ओढू नकोस असे राधिकाला सांगतो. पण राधिका गुरुचे काही एक न जुमानता उलट गुरुलाच त्याने तिच्याशी वागलेल्याची आठवण करून देते आणि गुरुला कॅबिनमधून बाहेर काढते. दुसरीकडे सरीता तिच्या नावावर श्री सुभेदारांनी खरेदी केलेल्या प्लॉटचे पेपर शोधात असते तेवढ्यात तिथे श्री सुभेदार येतात आणि काय शोधत आहेस असे विचारातात, तेव्हा सरीता म्हणते तुम्ही माझ्या नावावर केलेल्या प्लॉटचे मला पेपर्स हवे होते ते शोधत आहे. ते कशाला हवे आहेत असे विचारल्यावर सरीता काहीच बोलत नाही, तेव्हा श्री सुभेदाराच्या लक्षात येते की गुरुसाठी हवे असणार हिला पेपर.


म्हणून श्री सुभेदार म्हणतात त्या नायलायक मुलासाठी हवे असतील ना! असे ऐकल्यावर सरीता हो म्हणते व पुढे माझा मुलगा हुशार आहे असे बोलून निघून जाते. तिकडे गुरु पुन्हा केड्याला फोन करून त्याने दिलेली आयडीया वाया गेली असे सांगतो. व जरा शनायाला समजाव असेही म्हणतो. गुरूने मागितलेल्या माफीचा राधिका काही विचार करून गुरुचे वाईट दिवस सरतील का ते बघण्यासाठी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.