COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात ए. एल. एफ. कंपनीतुन झाली. राधिका शनायाल टेबल पुसायला लावते आणि शनाया मुकाट्याने ते काम करू लागते. तेव्हा सौमित्र तिची चांगलीच खिल्ली उडवते. काही वेळाने राधिका तिला कॅबिनमधून बाहेर काम करण्यासाठी पाठवते. दमरम्यान पुढे काय करायचे ठरवले आहेस असे सौमित्र राधिकाला विचारतो तेव्हा सांगते असे सांगून राधिका गुरूला कॅबिनमध्ये बोलावून घेते. बाहेर सर्वजण आपापल्या नव्या जागा निवडून स्वतःला आणि नव्या जागेला व्यवस्थित सजवून सावरण्याचा प्रयत्न करीत असतात.


दरम्यान डायरेक्ट कॅबिनमध्ये शिरलेल्या गुरूला पुन्हा बाहेर पाठवते आणि दरवाजा वाजवूनच आता या असे सांगते. तिचे गुरुला मान्यच करावे लागते. गुरु बाहेर गेल्यावर राधिकाच्या भावनांचा बांध फुटतो आणि तीला गुरूचा अपमान करण्याचे तिला फार दुःख होते. दरम्यान तिला सौमित्र शांत करून समजावतो. दुपारी श्री सुभेदार आणि सरीता जेवण करत असतात एवढ्यात श्री सुभेदारांना त्यांनी आणलेल्या गुलाबजाम ची आठवण होते आणि ते घेऊन येतात, पण सरीता मात्र ते घेण्यास नकार देते. तेव्हा त्या दोघांची पुन्हा गुरु आणि राधिकावरून बाचाबाची होते आणि सरीता जेवणावरून उठून आपल्या खोलीत जाते.


दरम्यान ए. एल. एफ. कंपनीतले सारे कामगार जेवण करत असतात आणि शनाया मात्र भुकेने व्याकुळ झालेली असते. इतरांना जेवताना बघून शनाया गुरुला जेवण आणण्याचा आग्रह धरते. तेव्हा गुरु आपल्या बच्चसाठी जेवण आणायला ऑफिस बाहेर जातो. शनायासाठी जेवण आणायला गेलेला गुरु परत आल्यावर राधिका त्याला पुन्हा खडसावणार का हे बघण्यासाठी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.