Meenakshi Seshadri On Amitabh Bachchan And Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. 1980 मध्ये मीनाक्षी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केलीय 1996 पर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या काळात त्या बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्री देखील होत्या. त्यांनी नुकत्याच दिलेलया एका मुलाखतीत कोणती गोष्ट आहे जी महिलांचं करिअर जास्त काळ चालू न ठेवण्यापासून थांबवते. मीनाक्षीनं सांगितलं की पुरुषांकडे घर सांभाळण्याचं किंवा बाळाला जन्म देण्याची जबाबदारी नसते. या कारणामुळे अमिताभ बच्चन, जीतेंद्र आणि धर्मेंद्र सारखे लोक देखील काम करत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहरे मेट्रोला मीनाक्षी यांनी नुकतीच मुलाखत दिली होती. त्यावेळी याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, 'अनेक कारणं आहेत ज्यामुळे पुरुष कलाकार हे इंडस्ट्रीमध्ये जास्त काळ राहतात. इतकंच नाही तर धर्मेंद्र, जीतेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची पिढी, हे अजूनवर काम करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांना घरातली काम नसतात. ते पूर्णपणे स्वत: च्या करिअवर लक्ष केंद्रित करु शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे, मुलं, प्रेग्नंसी किंवा मग मुलांचं संगोपन करण्याची चिंता त्यांना नसते. हे सगळं करण्याची जबाबदारी ही एका महिलेची असते. त्यामुळे हे पुरुष कलाकार खूप चांगल्या प्रकारे कामावर लक्ष केंद्रित करू शकतात.' 



मीनाक्षी यांनी हे देखील सांगितलं की 'लोकांना नक्कीच ते आवडत असतील. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे.' 


पुढे सहकलाकारांसोबत असलेला अनुभव सांगत मीनाक्षीनं सांगितलं की 'लोकं बोलतात की राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या मूडवर सगळं अवलंबून असतं. पण त्यांच्यासोबत काम करून मीनाक्षी यांना असं काही वाटलं नाही. मीनाक्षी या बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर कमबॅक करण्याचा विचार करत आहेत.' त्यांनी सांगितलं की 'त्यांना कोणती स्क्रिप्ट आवडली तर नक्कीच त्या चित्रपट करतील.' दरम्यान, मीनाक्षी या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. 


हेही वाचा : PHOTO : नागार्जुन यांनी दाखवलं सुनमुख; लेकाच्या साखरपुड्यातील फोटो शेअर करत दिली गोड बातमी! म्हणाले...


मीनाक्षी यांच्याविषयी बोलायचे झाले तर 1996 मध्ये त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्या स्वत: या इंडस्ट्रीपासून लांब झाल्या. मग त्या अमेरिकेत जाऊन राहू लागल्या. आता वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा अभिनयाकडे येण्याचा निर्णय घेतला आहे.