सोशल मीडियावर जावेद जाफरीच्या मुलीची जोरदार चर्चा
बॉलिवूडच्या या कलाकारांच्या मुलांसोबत आहे मैत्री
मुंबई : अभिनेता, डान्सर, कॉमेडिअन आणि रिऍलिटी शोमध्ये जज असलेल्या जावेद जाफरीला कोण ओळखत नाही. जावेद आपल्या अभिनयामुळे जेवढा चर्चेत राहिला तेवढाच तो आपल्या खासगी जीवनात लाइम लाइटपासून लांब राहिला. आता जावेद जाफरीप्रमाणेच त्याची मुलगी अलविया जाफरी देखील चर्चेत आहे.
जावेदची मुलगी अलविया जाफरी ही 24 वर्षांची आहे. तसेच ती मीजान जाफरीची लहान मुलगी आहे. याबरोबरच तिचा लहान भाऊ अब्बास देखील आहे.
अलविया जाफरीने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये पारसंस स्कूल ऑफ डिझाइनमधू फॅशन आणि डिझाइनचं शिक्षण घेतलं आहे.
अलविया सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. फोटोशू्ट्स, लूक्स आणि आऊटफिट्सचे लोग वेडे आहे.
अलविया जाफरीची मैत्री ही जान्हवी कपूर, अमिताभ बच्चनची नात नव्या नंदा, अनुराग कश्यपची मुलगी आलिया आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत आहे.
तसेच आलिया कश्यप आणि अलाना पांडे यांच्यासोबत अलविया मीडिया इन्फ्लुएंसर आहे. या तिघी मिळून कोलैब ट्राइब नावाने वेबसाइट चालवते. ही नवी वेबसाइट नव्या पीढीकरता नवीन आयडियाज घेऊन येत असतात.