मुंबई : भोजपुरी चित्रपटसृष्टीत दोन बायका आणि गरीब नवरा यांसारख्या कंटेंटला खूप पसंती दिली जाते. चित्रपट निर्माते देखील याभोवती गोष्ट फिरवतात. मात्र, 'मेरे पति की शादी है' या चित्रपटात काजल राघवानी महत्त्वाची भूमिका साकारत आहे. चित्रपट सुरू असताना, काजल राघवानीने सेटवरून तिच्या सहकलाकारासह एक मोहक फोटो शेअर केला. या चित्रपटात ती गायक-अभिनेता दिनेश लाल यादव आणि आम्रपाली दुबे यांच्यासोबत दिसणार आहे. यासोबतच 'पति पत्नी और वो' सारखे ट्रायन्गल असलेले हे चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहेत. 


आणखी वाचा : ट्रान्सजेंडर गौरी सावंतचा संघर्ष येणार रुपेरी पडद्यावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राघवानीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये लव्ह ट्रायन्गलबद्दलची कॉमेडी संपूर्ण मनोरंजनाचे आश्वासन देत आहे. आम्रपाली दुबे आणि काजल राघवानी या दोन्ही अभिनेत्री साडीत सुंदर दिसत आहेत तर दिनेश लाल यादव पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसत आहेत. 'नवीन चित्रपट मेरे पती की शादी है' असे कॅप्शन त्यांनी पोस्टला दिले. मंजुल ठाकूर दिग्दर्शित, मेरे पती की शादी है मध्ये संजय पांडे आणि रंभा साहनी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.


आणखी वाचा : 'लैंगिक अत्याचार करणाऱ्यांचं...', 'बिग बॉस'मध्ये साजिद खानला पाहून संतापली उर्फी जावेद



आणखी वाचा : करिअरच्या शिखरावर अभिनेत्यानं का घेतला आश्रमात टॉयलेट साफ करण्याचा निर्णय?


याशिवाय काजल राघवानीनं 'सलामी', 'लक्ष्मी बिटिया', 'दंड नायक', 'पडोसन', 'तू मेरी मोहब्बत है', 'अमानत' आणि 'मुझे कुछ कहना है' या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहेत. 'राजा डोली लेके आजा'मध्ये श्रुती राव दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारत आहे, तर दिनेश लाल यादव 'निरहुआ' आणि अक्षरा सिंग 'सबका बाप अंगूठा छाप' चित्रपटात दिसणार.