मुंबई : #MeToo चळवळ सुरू होताच बॉलिवूडमधील अनेक फिल्म मेकर्स आणि अभिनेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले.बॉलिवूडमध्ये ही चळवळ सुरू होण्याचं संपूर्ण क्रेडिट तनुश्री दत्ताला जातं. तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरांवर सेटवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. याचवेळी पत्रकार करिश्मा उपाध्यायने फिल्ममेकर साजिद खानवर सेक्सुअल हरॅशमेंटचा आरोप लावला. त्यानंतर दोन अभिनेत्रींनी देखील साजिद खानवर आरोप लावले. अभिनेत्री सलोनी चोप्रा आणि रॅचल वाइट आता समोर आल्या आहेत. यांनी सांगितलं की, अनेक महिने साजिद खानने सेक्सुअली आणि मेंटली हरॅश केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 मध्ये रॅचलने 'उंगली' या सिनेमांत इमरान हाशमीसोहत काम केलं होतं. रॅचलने सांगितलं की, जेव्हा मी पहिल्यांदा साजिद खानला भेटले तेव्हा त्यांनी मला कपडे काढायला लावले. तसेच 'हमशकल्स' सिनेमाकरता माझ्या एजन्सीने मला साजिद खान यांना भेटायला सांगितलं. हे बोलणं झाल्यावर अगदी 5 मिनिटांत साजीद खान यांचा फोन आला आणि त्यांनी मला इस्कॉन जुहूच्या समोरील बंगल्यात भेटायला बोलावलं. मी घरी भेटण्यासाठी कम्फर्टेबल नव्हती. तेव्हा तो म्हणाला की, काळजी करू नकोस मी माझ्या आईसोबत इथे राहतो आणि ती देखील असेल. 


घरी पोहोचल्यावर त्याच्या मेडने मला हॉलमधून बेडरूममध्ये बसायला सांगितलं. तेव्हा मी सफेद टॉप आणि ब्लू जीन्स घातली होती. पण साजिद मला इतक्या घाणेरड्या नजरेने बघत होता की, मला वाटलं मी कपडेच घातले नाहीत. त्यानंतर माझ्या जवळ आला आणि ब्रेस्ट बद्दल बोलत असल्याचा आरोप केला आहे.  त्यानंतर त्याने तिला कपडे काढायला सांगितले कारण सिनेमांत हिरोइनला बिकीनी घालायची आहे. पण रॅचलने त्याला नकार दिला. असेच आरोप सलोनीले देखील लावले आहेत.