मुंबई : जेव्हा बॉलीवूडची अभिनेत्री तनुश्री दत्ताने #MeToo आंदोलनाची सुरूवात केली. तेव्हा, चित्रपट जगतातील लोकांनी तिचं जोरदार समर्थन केलं. मात्र आता या अभियानावर टेलिव्हिजन अॅक्ट्रेस आणि बिगबॉस ११ ची विजेती, शिल्पा शिंदेने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पाने #MeToo हे थोतांड असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात महत्वाची बाब अशी की, शिल्पा शिंदेने काही दिवसांपूर्वी 'भाभी जी घर पर है'चे निर्माते, संजय कोहली यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. पण आता  #MeToo च्या प्रश्नावर काही वेगवेगळे दृष्टीकोन समोर येत आहेत. 


शिल्पाने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत #MeToo आंदोलनावर म्हटलं आहे, चित्रपट सृष्टीत बलात्कार होत नाहीत, सर्व काही सहमतीने होत असतं.


शिल्पा पुढे असं म्हणते, इंडस्ट्रीची गिव एंड टेक पॉलिस आहे, ती आप आपसातल्या  सहमतीवर आधारीत आहे. ही इंडस्ट्री एवढी चांगलीही नाही, आणि एवढी खराब देखील नाही.


शिल्पा शिंदे यावर आणखी म्हणते, मला लक्षात येतं नाहीय, लोक इंडस्ट्रीला स्वत:हून का बदनाम करीत आहेत. जे लोक काम देत आहेत, आणि जे लोक काम करीत आहेत, का सर्वच नालायक लोक आहेत का? असं नाही, हे आपल्यावर आहे, आपण कसे आहोत?


महिला आता बोलत आहे, पण माझं मत असं आहे की, इंडस्ट्रीत रेप होत नाहीयत, जबरदस्ती देखील नाही, जे काही होत आहे, आपआपसातील सांमजस्याने होत आहे. जर तुम्ही मागणी पूर्ण करू शकत नाहीत, तर ती गोष्ट तेथेच सोडून द्या.


तुमच्यासोबत जेव्हा घटना घडली तेव्हाच बोलायला पाहिजे, नंतर बोलून फायदा नाही, भूतकाळात माझ्यासोबत जे घडलं आहे, त्यावरून मी हे शिकले आहे.


आता जे होत आहे ते एक वेगळंच चाललंय. याचं आता पुढे काही होणार नाहीय. सर्व आणखी तसंच होणार आहे, जसं आधी सुरू होतं.