COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा म्होरक्या या चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांनी 38 व्या वर्षी आत्महत्या केलीय . आतड्याच्या कर्करोगाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आपल्या  राहत्या घरी आपलं आयुष्य संपवलं. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सोलापूरातील राहत्या घरी आत्महत्या केली होती पण घरच्यांनी ही बातमी गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी आज ही दुख:द बातमी समोर आली आहे. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या  कल्याण पडाल यांना काविळीचाही त्रास होता. शिवाय कर्करोग हा शेवटच्या स्टेजला होता. कल्याण पडाल यांचं वय केवळ 38 वर्षे एवढं होतं. मात्र कर्करोगाने त्यांना ग्रासलं आणि आजाराला वैतागून त्यांनी आयुष्य संपवलं.  


कल्याण पडाल यांच्या म्होरक्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने या सिनेमाची मोठी उत्सुकता होती. हा सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर असताना कल्याण यांनी आत्महत्या केलीय.