मिका सिंगच्या भावाचे निधन
गायक मिका सिंगने त्याचा मोठा भाऊ उस्ताद शमशेर सिंग यांचे निधन झाल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे.
नवी दिल्ली : गायक मिका सिंगने त्याचा मोठा भाऊ उस्ताद शमशेर सिंग यांचे निधन झाल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे.
ट्विटसोबतच त्याच्या भावासोबतीचा खास फोटो शेअर करण्यात आला आहे. मिका सिंगने ट्विट केलेल्या फोटो खाली खास संदेशही लिहला आहे.
मिका सिंग सध्या कॅनडामध्ये आहे. तेथूनच ट्विटरच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली आहे. मिकाच्या प्रवक्त्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, शमशेर सिंग गेले अनेक दिवस काविळच्या त्रासाने त्रस्त होते. दिल्लीच्या वेदांता हॉस्पिटल्समध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
शमशेर सिंग अनेकदा दलेर मेहंदीसोबत कार्यक्रमामध्ये एकत्र झळकले होते. शमशेर सिंग गाणी लिहण्यात आणि रेकॉर्डींग प्रोड्युसर म्हणून प्रसिद्ध होते.
हर्षदीप कौर, राहुल देव सह अनेक सेलिब्रिटींनी शमशेर सिंग यांना ट्विटरवरून श्रद्धांजली दिली आहे.