गर्लफ्रेंड्सची गर्दी असताना, पाहा कोण ठरली Mrs. Mika Singh ?
मिला सिंगसाठी मुलींची लग्नासाठी स्पर्धा लागली होती.
Mika Singh Wedding : एकेकाळी राखी सावंतमुळे चर्चेत आला मिका सिंग नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. स्टार भारत या चॅनेलवर 'स्वयंवर - मिका की वोती' हा कार्यक्रम काही दिवसांपुर्वी सुरू झाला या शोमधून मिका सिंगने आपले लग्न आयोजित केले होते. मिला सिंगसाठी मुलींची लग्नासाठी स्पर्धा लागली होती. या शोमधून 15 ते 20 जणींनी सहभाग घेतला होता. परवाच या शोचा अंतिम सोहळा पार पडला ज्यात तीन फायनलिस्टपैंकी आकांक्षा पुरी हिने मिकाचे मनं जिंकून घेतले आणि त्यांनी एकमेकांना वरमाला घातली.
या शोला सुरूवातीपासूनच प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला होता. या शोच्या फिनालेमध्ये प्रतिका दास, आकांक्षा पुरी आणि नीत महाल या तिघी अंतिम फेरीत पोहचल्या होत्या. त्या तिघींच्याही मेहेंदी आणि हळदीचे कार्यक्रम अंतिम सोहळ्यात पार पडले होते. परंतु विवाहसोहळा मात्र एकीचाच झाला आणि मिकासाठी योग्य वधू ठरली आकांक्षा पुरी. समोर आलेल्या माहितीनूसार, गेली बारा वर्षे आकांक्षा आणि मिका एकमेकांना ओळखत होते. मिकाची आणि तिची खूप चांगली मैत्री होती. ते दोघं कधी रिलेशनशिपमध्ये नव्हते पण मिकाची लग्न करण्याची आकांक्षाची इच्छा होती. तो तिचा क्रश होता आणि जेव्हा आकांक्षाला कळले की मिकाने टेलिव्हिजनवर आपले लग्न योजिले आहे तेव्हा आकांक्षानेही त्या शोंमध्ये सहभाग घेतला. वर्षभरापुर्वी त्यांच्या रिलेशनशिप्सच्या चर्चा रंगल्या होत्या.
आकांक्षाने या शोमधून वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. मिकाने आकांक्षाला निवडताना आपल्या प्रेमाची कबूली दिली आणि दोघंही शोमधून विवाहबंधनात अडकले. आता लवकरच ते दोघं ऑफिशियल मॅरेज करणार आहेत.
मिका सिंग हा एक गायक असून त्याची पॉप गाणी भलतीच फेमस आहेत. त्याने आत्तापर्यंत पंजाबी गाण्यांवर आणि रॅप म्यूझिकवर आपला वकूब तयार केला आहे. हिंदी सिनेसृष्टीत मिल्का सिंग लोकप्रिय गायक असून त्याच्या अफेयर्सच्या याआधीही भरपूर चर्चा रंगल्या होत्या. अनेकदा त्याच्यावर आरोपही विविध कारणांसाठी करण्यात आले आहेत. राखी सावंतला जबरदस्ती किस केल्यानंतर मिका सिंग हे नावं खऱ्या अर्थी चर्चेत आले होते.