मुंबई : बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध गायक मिका सिंग लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.  मिकाने त्याच्या स्वयंवरमध्ये टॉप 3 राजकुमारींची निवड केली आहे. यातील एक मिका सिंग पत्नी होणार आहे. मात्र, शोच्या फिनाले एपिसोडपूर्वीच मिकाची खास मैत्रिण आकांक्षा पुरी स्वयंवरची विजेती ठरल्याच्या चर्चा सुरु आहेत. आकांक्षाने मिकाचं मन आणि स्वयंवर हा शो जिंकला की नाही, हे तर लवकरच कळेल. पण मिका सिंग ज्या मुलीशी लग्न करेल तिचं नशीब उजळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिका हा भारतातील सर्वात प्रसिद्ध गायक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्याकडे कोटींची संपत्ती आहे. शो दरम्यान, एका टास्कदरम्यान, मिकाने सगळ्या स्पर्धकांना सांगितले की,तो त्याच्या संपत्तीपैकी २५ टक्के संपत्ती त्याच्या पत्नीच्या नावावर करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, मिका एका ब्रँडच्या जाहिरतीसाठी लाखो रुपये मानधन म्हणून घेतो. मिकाचे मुंबईत आलिशान घर आहे आणि याच घरात तो राहतो. याशिवाय त्याच्याकडे अनेक प्रॉपर्टी आहेत. मिकाला लक्झरी गाड्यांची प्रचंड आवड असून त्याच्याकडे बऱ्याच महागड्या गाड्या आहेत. 



ETimes ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार मिकाने स्वतःच्या स्वयंवरमध्ये सहभागी होण्यासाठी ५० कोटी रुपये मानधन म्हणून घेतले. मिकाने अनेक उत्तम गाणी गायली आहेत. त्याची गाणी ही प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी गाणी ठरली आहेत. सगळ्यांची मने जिंकलेल्या मिकाचं मन कोणी जिंकलं हे आपल्याला लवकरच कळणार आहे.