``जावई बापू जय हो``; मिलिंद गवळी यांच्या `त्या` पोस्टनं वेधलंय सर्वांचं लक्ष
Milind Gawai Post on Son in Law: `आई कुठे काय करते` या मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी अनेकदा चर्चेत असतात. सध्या त्यांनी आपल्या जावयावर एख खास पोस्ट लिहिली आहे. यावेळी त्यांनी केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
Milind Gawai Post on Son in Law: 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या सर्वत्र लोकप्रिय ठरली आहे. गेली चार वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. या मालिकेतून घरोघरी पोहचलेले अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियावरही त्यांचे अनेक फॉलोवर्स आहेत. खासकरून त्यांच्या पोस्टही चांगल्याच चर्चेत असतात. आता त्यांची अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच त्यांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी आपल्या जावयाचे भरभरून कौतुक केले आहे. यावेळी याला हे एक खास कारण ठरलं आहे. मिलिंद यांनी एक पोस्ट यावेळी शेअर केली आहे. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया की नक्की ही पोस्ट कशासाठी शेअर केली आहे.
मिलिंद गवळी याच्या जावयाचा वाढदिवस नुकताच साजरा झाला आहे. या निमित्तानं त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे सासरा आणि जावई याचे एक वेगळेच नाते त्यांच्या या पोस्टमधून दिसते आहे.
यावेळी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ''जावई बापू जय हो'' जावई हे असे व्यक्तिमत्व असतं, ज्याला मुलीच्या माहेरी सगळ्यात मोठ आणि सगळ्यात महत्त्वाचे स्थान असतं, मी माझ्या लहानपणापासून जावयाला किती महत्त्व असते हे आमच्या घरामध्ये बघत आलो आहे, माझ्या आजी आजोबांना पाच जावई होते, especially माझ्या आजी साठी ते किती महत्त्वाचे होते ते मी पहात आलो होतो, त्यात माझ्या वडिलांसारखा अगदी समंजस, प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष असा जावई त्यांना मिळाला होता, म्हणून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, सगळ्यांना त्यांचं कौतुक करता करता आजीची जीभ थकायची नाही, माझ्या आजी आजोबांसारखा त्याबाबतीत मी खूप नशीबवान आहे.
मला दिग्विजय (ज्याला मी प्रेमाने दिगू बाबा म्हणतो), जो जावई म्हणून आला आणि माझा मुलगाच झाला, तसंच तो माझा मित्र पण झाला, त्याचबरोबर तो माझा philosopher, and guide पण झाला, त्याला सिनेमाची अतोनात आवड असल्यामुळे आणि Encyclopedia सारखी सिनेमा क्षेत्राची माहिती व अभ्यास असल्या मुळे, ही मैत्री अजूनच घट्ट झाली आहे, सिनेमाबद्दलच्या त्याच्या ज्ञानाने मी सतत अवाक होत असतो, गेल्या पाच वर्षात त्यांनेच सांगितलेले सिनेमे मी बघितले आहेत. दिसायला राजबिंडा तो आहेचं , त्याचबरोबर physical fitness आणि mental health ला प्रथम प्राधान्य देणारा, स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा, गेली तीन वर्ष अनिरुद्ध देशमुख ने माझ्या डोक्याचा जो भोगा केला आहे, पण दिगू बाबा नेच मला बऱ्यापैकी माणसात ठेवण्याचा प्रयत्न केला , म्हणजे तो माझ्या जावयाबरोबर मुलगा आणि कौन्सिलर माझा Counselor पण झालाय.
आज दिगू बाबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला भरभरून आशीर्वाद , खूप खूप शुभेच्छा, खूप खूप प्रेम, यशस्वी हो, असाच नेहमी मस्त , आनंदी आणि बिनधास्त रहा. मी भाग्यवान आहे नशीबवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. I Love You My Son'' अशी भावना मिलिंद गवळी यांनी मांडली आहे.