मुंबई : अभिनेता, मॉडेल आणि फीटनेस फ्रीक मिलिंद सोमण आज पुन्हा विवाहबंधनात अडकला आहे. मिलिंदपेक्षा 25 वर्ष लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत मिलिंद आज अलिबागमध्ये विवहबंधनात अडकला. 


 अंकिता सोबत अडकला लग्नबंधनात   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अंकिता कोंवर ही मिलिंदपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. अलिबागमध्ये मिलिंद आणि अंकिता या दोघांनी गोल्डन रंगाचे कपडे परिधान केले होते. काल अंकिता आणि मिलिंद यांच्या हळदीचे, अंकिताच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो व्हायरल झाले होते.   मिलिंद सोमणचा गर्लफ्रेन्डसोबतचा डान्स व्हीडीओ व्हायरल


 




 ब्रेक अपच्या बातम्या केवळ अफवा  


 मिलिंद सोमण आणि अंकिताचं लग्न मोडल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. मात्र त्या केवळ अफवा होत्या हे सिद्ध करत दोघेही एकत्र आले. त्यांनी काहीही न बोलता केवळ फोटो शेअर करून अफवांना पूर्णविराम दिला आहे. 


 
 मिलिंद फीटनेस फ्रीक   


 मिलिंद सोमण हा अभिनेता आणि मॉडेल म्हणून अनेक वर्ष मराठी, हिंदी भाषेप्रमाणेच जगभरातील अनेक प्रोजेक्टचा भाग झाला होता. कलाक्षेत्राप्रमाणेच मिलिंद हा फीटनेस फ्रीक आहे. आयर्नमॅनसारखी कठी ण जागतिक स्पर्धा मिलिंद वयाच्या 50व्या वर्षी पार पाडली आहे.