मिलिंद सोमणभोवती Bold Beauties ची गर्दी; Video पाहून म्हणाल, `अरे पुरे आता...`
Ufff! तरुणीच काय, कोणत्याही वयोगटातील महिला भाळतील असाच हा व्हिडीओ
मुंबई : 90 च्या दशकात अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण अनेकांचा क्रश होता. पण आता फक्त 90 च्या दशकातील नाही, तरुण मुलींनाच्या मनात देखील मिलिंदने आधिराज्य गाजवलं आहे. कायम फिटनेसमुळे चर्चेत असणार मिलिंद आता एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. 25 वर्षांनंतर मिलिंद पुन्हा एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे. आता देखील महिलांना घायाळ करण्यासाठी मिलिंद सज्ज झाला आहे. सध्या मिलिंदचा नवा म्युझिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नुकताच प्रदर्शित झालेल्या म्युझिक व्हिडीओमध्ये मिलिंद सोमणने स्वत:ला अतिशय मादक रित्या सादर केले आहे. आकासा आणि आस्था गिल यांच्या आवाजाची जादू गाण्यात पाहायला मिळत आहे. हे एक पार्टी साँग आहे, ज्यामध्ये रॅपर रफ्तारही आपला कमाल दाखवला आहे.
लोकांनी गाण्याला हॉटेस्ट पार्टी एंथम ऑफ द ईयर असं म्हणायला देखील सुरुवात केली आहे. मिलिंदच्या या नव्या म्युझिक व्हिडीओतील गाण्याचं नाव श्रृंगार (Shringaar) असं आहे. व्हिडीओ पाहून काही चाहत्यांनी 'अरे पुरे आता...' अशी कमेंट केली आहे, तर काहींनी मात्र पसंती दर्शवली आहे.
मिलिंदचं गाणं फक्त प्रेक्षकांना नाही, तर आई आणि पत्नीला देखील फार आवडल आहे. मिलिंदची पत्नी अंकिताने इन्स्टा स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने पतीचं कौतुक केलं आहे. व्हिडीओमध्ये मिलिंदच्या भोवती बोल्ड तरुणी दिसत आहेत.