मुंबई : मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणचा रिपोर्ट नुकताच कोविड निगेटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी मिलिंद सोमणला कोरोनाची लागण झाली आहे. मिलिंद सोमण घरीच क्वारंटाईन असून आयसोलेटेड होता. या काळात मिलिंद सोमणने स्वतःला या आजारापासून वेगवेगळ्या कारणाने लांब ठेवलं आहे. आता कोरोनामुक्त झालेल्या मिलिंद सोमणने चाहत्यांसोबत ही गोष्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका व्हिडिओत मिलिंद सोमण वर्कआऊट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मिलिंद सोमणने क्वारंटाईनच्या शेवटच्या दिवशी शेअर केला आहे. 



व्हिडिओ शेअर करताना,'व्यायाम करण्याचा प्रयत्न करत आहे.' मिलिंदच्या या पोस्टनुसार त्याची पत्नी अंकिता कोंवरने हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. व्यायामासाठी वापरलेलं हे साधन हलक्या व्यायामासाठी वापरलं जातं. 



व्यायामासोबतच त्याने चाहत्यांसोबत काढ्याची रेसिपी सुद्धा शेअर केली होती. यामध्ये तो कोथिंबीर, काळी मिरी, तुळस, अदरक आणि गुळ याचा समावेश करून घेतो.



मिलिंद सोमणने आतापर्यंत जवळपास 30 वेळा कोरोना चाचणी केली आहे. कामाच्या निमित्ताने बाहेर पडताना ही काळजी घेणं आवश्यक होतं. आता तो रुटीनचा भाग झाला होता. असं असताना काही दिवसांपूर्वीच मिलिंद सोमणला कोरोनाची लागण झाली.



14 दिवसांच्या या क्वारंटाईनमध्ये मिलिंद सोमणने नेमकं काय काय केलं आहे, ते आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केलं आहे.