मिरा राजपूत तिसऱ्यांदा गरोदर?
अभिनेता शाहीद कपूर आणि मिरा यांना दोन मुलं आहेत.
मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच त्यांच्या कुटुंबाबाबत जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. दरम्यान अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मिरा राजपूत चांगलेच चर्चेत आहे. सतत सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मिराने नुकताच इन्स्टाग्रामवर AskMeAnything सेशन ठेवलं होतं. या सोशनच्या माध्यमातून चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. या सेशन दरम्यान एका युजरने मिराला असा प्रश्न विचारला ज्यामुळे तिला आश्चर्याचा धक्का बसला.
AskMeAnythingच्या माध्यमातून चाहत्यांनी मिराला तिच्या आवडत्या पदार्थासोबतच तिच्या आवडत्या हॉलिडे डेस्टिनेशन्सबद्दल प्रश्न विचारले. यावर मिराने देखील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. याच दरम्यान एका युजरने तिला तू तिसऱ्यांदा गरोदर आहेस का.. असा प्रश्न विचारला.
यावर मिराने नाही म्हणून उत्तर दिले. शिवाय हसण्याचा इमोजी देखील पाठवला आहे. त्यानंतर दुसऱ्या चाहत्याने तू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेस का.. असा प्रश्न विचारल. यावर तिने नाही म्हणून उत्तर दिले आहे.
सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर मिराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एका अभिनेत्रीप्रमाणे तिच्या चाहत्यांची संख्या आहे. मिरा आणि शाहीदला २ मुलं आहेत. त्यांना ४ वर्षांची मुलगी मिशा आणि २ वर्षांचा मुलगा झैन आहे. २०१५मध्ये त्यांचं लग्न झालं होतं.