मुंबई : अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. आता देखील मीराचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये मीरा तिच्या दोन मुलांसोबत दिसत आहे. हा फोटो अभिनेता ईशान खट्टरने क्लिक केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मीरा मुलांसोबत फार आनंदी दिसत आहे. फोटोवर ईशानने कमेंट करत म्हटलं की, 'ईशाला सँडविच फार आवडतो आणि मी फार छान फोटो क्लिक करतो....'



यावर मीरा म्हणाली, 'तू कॅचप आहेस... आणि गेस कर आणखी कोणाला आवडचं कॅचप....' मीराच्या या कमेंटनंतर युजर्स अभिनेत्री अनन्या पांडेला अधिक कॅचप आवडत असल्याचं म्हणत आहेत. 


अनन्या आणि ईशानबद्दल सांगायचं झालं तर, दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं वारंवार समोर आलं. शिवाय अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात, एवढंच नाही तर व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत दोघे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर जात असतात.