मुंबई :  अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. शिवाय त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी देखील समोर येत असतात. पण आता  शाहीद आणि मीरा एका फोटोमुळे चर्चेत आले आहे. सध्या व्हायरल होत असलेला फोटो मीरा राजपूतच्या लहानपणीचा आहे. हा फोटो खुद्द मीराने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मीराच्या फोटोवर अनेकांने लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहीदचा पहिला चित्रपट रिलीज झाला तेव्हाचा हा फोटो आहे. खुद्द मीरा राजपूतने तिचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पांढरा पायजमा घातलेला दिसत होता.


दरम्यान, शाहीदच्या आयुष्यात अनेक मुली आल्या, परंतु अभिनेत्याने आई-वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं. शाहिदने स्वतःपेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या मीरा राजपूतसोबत लग्न करून अनेकांना आश्चर्यचकित केले. 



शाहिद आणि मीराच्या वयातील अंतरावरून अनेकवेळा अभिनेत्याला ट्रोलही करण्यात आलं. पण अभिनेत्याने याची पर्वा केली नाही. आज शाहीद आणि मीरा अनेकांना कपल गोल्स देत असतात. 


कसं आहे शाहीद मीराचं नातं?
शाहीद आणि मीरा यांनी 2015 मध्ये लग्न केले. तेव्हापासून ते अनेकांना कपल्स गोल्स देत आहेत. शाहिद आणि मीरा यांना मीशा कपूर आणि झैन कपूर ही दोन मुले आहेत. 2017 मध्ये या दोघांना मीशा ही मुलगी झाली. जैन यांचा जन्म 2018 मध्ये झाला.


वडील होण्याच्या अनुभवावर शाहीद कपूर म्हणाला की, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे. वडील झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप काही बदल झाले असून तो पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार झाला आहे.