मुंबई : टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत देशाचं नाव जागतिक पातळीवर उंच केलं आहे. त्यातीलच एक म्हणजे मीराबाई चानू.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदकं मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूवर संपूर्ण देशभरातून आणि सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. अशी दमदार कामगिरी करुनही मीराबाई चानूचे पाय हे जमिनीवरच आहेत. हे तिने दाखवून दिलं आहे. मीराबाईचे अनेक फोटो आणि व्हिडिओ यादरम्यान व्हायरल झाले.


मीराबाई डान्स दिवानेच्या मंचावर


मीराबाईने सचिन तेंडूलकर, सलमान खान यांची भेट घेतल्यानंतर आता ती धकधक गर्ल माधुरीच्या भेटीला पोहोचली. स्मॉल स्क्रिनवरील डान्स दिवाने या शोच्या मंचावर मीराबाईने हजेरी लावली आणि तिचं स्वप्न पूर्ण झाल्याचं मीराबाईने सांगितलं. 


https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/prerna_0.png


माधुरी भावूक, मीराबाईच्या डोळ्यातही पाणी


या खास एपिसोडमध्ये मीराबाईचा खडतर प्रवास दाखवणारा परफॉर्मन्सच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. हा डान्स  पाहून सगळेच थक्क झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतयं. तर हा डान्स परफॉर्मन्स पाहून मीराबाईदेखील भावूक झाली आणि तिला अश्रू आवरणं कठिण झालं. मीराबाईलासुध्दा डान्सची प्रचंड आवड आहे. 



माधुरी दीक्षितला भेटल्यानंतर मीराबाईचा आनंद ओसंडून वाहत होता. माधुरीच्या भेटीने यावेळी मीराबाई भावूक झाल्याचं दिसून आलं. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर "डान्स दीवाने " शोमध्ये हा खास एपिसोड पाहायला मिळणार आहे.