Mirzapur The Film Teaser Released: मिर्झापूर सिरीज ओटीटीवर खूप गाजली. पण आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी 'मिर्झापूर द फिल्म' हा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटातील कलाकार फरहान अख्तर, पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, अली फजल यांनी आपल्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचा पहिला टीझर शेअर केला आहे. मिर्झापूर सीझन 3 च्या यशानंतर ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट चाहत्यांसाठी एक खास मेजवानी ठरणार आहे. सिरीजपेक्षा मोठ्या पडद्यावरील हा चित्रपट प्रेक्षकांना अधिक रोमांचक अनुभव देईल. पुनीत कृष्णा निर्मित आणि गुरमीत सिंग दिग्दर्शित मिर्झापूर चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. थिएटर रिलीजच्या आठ आठवड्यांनंतर हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. 


मिर्झापूर मोठ्या पडद्यावरही ठरणार ब्लॉकबस्टर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मिर्झापूर ही वेब सिरीज खूप लोकप्रिय झाली. मिर्झापूर सीझन 3 रिलीज झाल्यानंतर काही महिन्यांनंतर आता निर्मात्यांनी 'मिर्झापूर द फिल्म' या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा रोमांचक टीझर रिलीज करण्यात आला आहे. प्राइम व्हिडीओ इंडियाचे कंटेंट लायसन्सिंग डायरेक्टर मनीष मेंघानी म्हणतात की, "मिर्झापूर आज तिच्या मनोरंजक पात्रांमुळे, संस्मरणीय संवादांमुळे आणि आकर्षक कथांमुळे सर्वात लोकप्रिय बनली आहे. आमच्या प्रेक्षकांच्या आवडीप्रमाणे आम्ही त्यांना नवनवीन कंटेंट देऊ इच्छितो. मिर्झापूरच्या वाढत्या लोकप्रियतेसोबतच आम्ही प्रेक्षकांसाठी अजून रोमांचक चित्रपट घेऊन येण्यासाठी उत्सुक आहोत." 


 


 



 


मिर्झापूरच्या गादीसाठी होणार रक्तरंजित युद्ध


 


मुन्ना त्रिपाठीची भूमिका साकारणाऱ्या दिव्येंदूच्या यातून परत येणार असल्याची शक्यता आहे. दुस-या सीझनमध्ये त्याचे पात्र मारले गेले आणि तिसऱ्या सीझनमध्ये तो पुन्हा दिसला नाही. पण यावेळी मिर्झापूरच्या गादीसाठी गुड्डू पंडित आणि मुन्ना भैय्या यांच्यातील युद्ध पाहायला मिळणार आहे. मोठ्या पडद्यावर त्यांच्यातील हा रक्तरंजित खेळ चांगलाच रंगणार आहे. त्यामुळे मिर्झापूर च्या यूएसपीमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे. 


'मिर्झापूर द फिल्म'मधील कलाकार 


 


पुनित कृष्णा निर्मित आणि गुरमीत सिंग दिग्दर्शित मिर्झापूर हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. यात कालिन भैया (पंकज त्रिपाठी), गुड्डू पंडित (अली फजल), आणि मुन्ना त्रिपाठी (दिव्येंदू) यांसारख्या मिर्झापूरच्या सुप्रसिद्ध पात्रांसह अभिषेक बॅनर्जी कंपाउंडर आणि इतर कलाकार देखील दिसणार आहेत. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आठ आठवड्यांनंतर, प्राइम सदस्य भारत आणि 240+ देशांमध्ये प्राइम व्हिडीओवर चित्रपट पाहू शकतील.