नवी दिल्ली: माजी मिस इंडिया अँड इंटरनॅशनल मॉडेल परसीस खंबाटा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर अमाप लोकप्रियता मिळविली. आतापर्यंत कोणत्याही भारतीय मॉडेल-अभिनेत्रीच्या नशिबी ही लोकप्रियता आली नाही. तिचा जन्म २ ऑक्टोबर १९४८ रोजी मुंबईमध्ये झाला. १९६५ मध्ये परसीस खंबाटा मिस इंडियाची बनली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर १९६७ साली तिने के.ए. अब्बास यांच्या 'बम्बई रात की बाहोमे' हा सिनेमा केला.



पण बॉक्स ऑफिसवर तिच्या नावाची पाहिजे तशी छाप दिसली नाही. १९७५ पासून तिने हॉलीवूडमधील चित्रपटांची सुरुवात केली.



भारतात लोकप्रिय असलेली परसीस खंबाटाने 'स्टारर्ट्रॅक: द मोशन पिक्चर' च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. ही गोष्ट आहे १९७९ सालची. 



'स्टार्ट्रॅक: द मोशन पिक्चर' मध्ये लेफ्टनंट इलियाच्या भूमिकेसाठी हजारो लोक ऑडिशनला आले होते. पण परसीस खंबाटा हीचीच यातून निवड झाली. अभिनेत्रीने मुंडन करावे ही अट या भूमिकेसाठी होती. खंबाटा हिने यासाठी लगेच होकार दिला.