श्रद्धा शशिधर `मिस युनिव्हर्स २०१७`मध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्त्व
मानुषी छिल्लरने `मिस वर्ल्ड २०१७` किताब पटकवल्यानंतर आता सार्यांचं लक्ष `मिस युनिव्हर्स`कडे लागलं आहे.
मुंबई : मानुषी छिल्लरने 'मिस वर्ल्ड २०१७' किताब पटकवल्यानंतर आता सार्यांचं लक्ष 'मिस युनिव्हर्स'कडे लागलं आहे.
कोण करणार भारताचं प्रतिनिधित्त्व ?
श्रद्धा शशिधर ही २१ वर्षीय मुलगी यंदा भारताचं मिस युनिवर्स २०१७ मध्ये प्रतिनिधित्त्व करणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी लॉस वेगासमध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. मिस युनिवर्स २०१६ हा किताब फ्रान्सच्या आईरिस मितिनेरेर कडे आहे.
श्रद्धाने नुकताच नॅशनल कॉस्ट्युम कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये प्रेम आणि प्युरिटी यांचं प्रतिक असणार्या राधाचं स्वरूप घेतलं होतं. श्रद्धाचा ड्रेस अबु जानी - संदीप खोसला आणी मेल्विन डॉमिनिक नोरोन्हा यांनी डिझाईन केलेला ड्रेस घातला आहे.
यामाहा फॅसिनो मिस दीवा
श्रद्धा मूळची बेंगळूरूची आहे. ११ ऑक्टोबर रोजी शाहीद कपूरने यामाहा फॅसिनो मिस दीवा हा किताब दिला होता.