Divita Rai: मंगळूरची दिविता राय हिनं मोठं यश संपादन केलं आहे. 14 जानेवारी, म्हणजे उद्या होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe Beauty Pegeant 2023) मधून भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. तेव्हा ही दिविता राय कोण आहे आणि तिचा आत्तापर्यंतचा प्रवास तुम्हाला नक्की प्रेरणा देणारा ठरेल. कधी काळी आई आजीनं तयार केलेला लिटिल मिस इंडिया हा किताब 2001 चा ड्रेस परिधान करण्यापर्यंत आता मिस युनिव्हर्समध्ये किताब जिंकेपर्यंत दिविताकडे आज अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं आहे. याआधी दिवितानं मिस युनिव्हर्स दिवा (Miss Universe Diva) 2022 चा किताब जिंकला आहे. आता हरनाज साधूनंतर (Harnaaz Sadhu) दिविताही मिस युनिव्हर्स होणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. (miss universe Divita Rai inspiration story know more about her views)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिविता ही व्यवसायानं वास्तूविशारद आहे. ती मुंबईतच लहानाची मोठी झाली आहे. त्याचसोबत तिला अनियमितपणे येणाऱ्या मासिक पाळीचाही त्रास होता. ज्याला पीसीओएसही म्हणतात. यावर ती म्हणाली होती की, मी PCOS नं ग्रस्त आहे. त्यामुळे आयुष्यातील अशाच एका टप्प्यातून मला जावे लागले होते. तेव्हा मात्र मी निरोगी आहार (Diet and Excercise) आणि व्यायामाकडे लक्ष देत होते. यामुळे मी स्वत:कडे खूप लक्ष दिले. परंतु अशा परिस्थितीत मी हार मानली नाही. 


अपयशातून यशाकडे - 


आपल्या या मिस युनिव्हर्सच्या अनुभवांबद्दल बोलताना दिवितानं सांगितले होते की तिचं हे बालपणीचं स्वप्न होतं की तिचंही नावं असेच जागतिक पातळीवर पोहचले जावे. या स्पर्धेत मोठे केस असावेत, चांगली शरीरयष्टी असावी आणि सुंदर चेहरा असावा अशा रूढ कल्पना मोडून काढून प्रत्येक मुलीला चांगली संधी प्राप्त करून दिली आहे. एखादी मुलगी स्वत:ला कशी प्रेझेंट करते यावर सगळं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण कसे बोलतो, वावरतो, आपण कसा विचार करतो हेही महत्त्वाचे असल्याचे तिनं एका हिंदी मुलाखतीत (Divita Rai Interview) सांगितले होते. 


हेही वाचा - Interesting : ब्लेडच्या मध्यभागी म्हणून असते 'हे' डिझाईन


स्वत:चा आदर करा - 


दिविताही गरीबीतून वर आलेली मुलगी आहे. तिच्या आईवडिलांनी कायमच तिला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन केले आहे. त्यामुळे तिचं नावं आज सगळीकडे आहे. तिच्यासाठी तिची इन्सिपिरेशन हे सुष्मिता सेन आहे. तिनं जे.जे. कॉलेजमधून आर्किटेक्चरची पदवी संपादन केली आहे. तिला बॅटमिंटनही (Divita Rai Trending) खेळायला खूप आवडते. दिविताचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वत:चा आदर करा, तुम्हाला यश आपसूकच मिळेल. त्यामुळे आपल्याला अथक प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्वत:वर विश्वास ठेवा.