मुंबई :  भारतातील 21 वर्षाच्या हरनाझ  कौर संधूने मिस यूनिवर्स 2021 हा किताब पटकावलाय. याआधी 2000 मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने आणि 1994 मध्ये सुष्मिता सेनने देखील हा मान पटकावला होता. इजराईलच्या इवियट शहरमध्ये पार पडलेल्या LIVA मिस डीवा यूनिवर्स 2021 मध्ये हरनाझ संधूने 75 देशाच्या सुंदर महिलांवर मात करत हा पुस्कार आपल्या नावे केलाायं. सर्व भारतीयांसाठी तो अभिमानाचा क्षण होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीस युनिव्हर्सचा मान मिळवल्यानंतर हरनाझ सतत चर्चेत आहे. हरनाझ सतत सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. 



फोटोंमध्ये हरनाझने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे. तिचा सिंपल मेकअप आणि मोकळे केस चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. 


तिच्या या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहेत. सध्या हरनाझच्या या फोटोंची सर्वत्र चर्चा आहे. मिस युनिव्हर्सचा किताब पटकावल्यानंतर हरनाजचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.


तिची लोकप्रियता किती वाढत आहे याचा अंदाज त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सवरून तुम्ही लावू शकता. मिस युनिव्हर्स बनताच हरनाजचे फॉलोअर्स सोशल मीडियावर वाढत आहेत.