मुंबई : चीनच्या सान्या शहरात आज मिस वर्ल्ड पेजेंटच्या 68 व्या सिझनचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये 32 देशांतील सुंदरी सहभागी होणार आहे. गेल्यावर्षी मिस वर्ल्ड हा किताब भारतच्या मानुषी छिल्लर जिंकला होता. यंदा मानुषी मिस वर्ल्ड 2018 हा ताज नव्या विश्व सुंदरीला घालणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पेजेंटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व तामिळनाडूची राहणारी अनुकृती वास करत आहे. अनुकृती वास जूनमध्ये आयोजित केलेल्या मिस इंडिया पेजेंटची विजेती राहिली आहे. 


हा कार्यक्रम 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता आयोजित केला आहे. अनुकृती वास ही या स्पर्धेत टॉप 30 देशातील विश्व सुंदरींसोबत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. 


चिली, फ्रान्स, बांग्लादेश, जपान, मलेशिया, मॉरिशस, मेक्सिको, नेपाल, न्यूझीलँड, सिंगापूर, थायलँड, युगांडा, अमेरिका, वेनेजुएला आणि वियतनाम या जगातील सुंदरी ताज करता आमने सामने करणार आहेत. 



कोण आहे अनुकृती


अनुकृती चेन्नईच्या लोयोला कॉलेजची विद्यार्थिनी आहे. फ्रेंच भाषेत बीए करत आहे. तसेच तिला गायनाची आणि नृत्याची आवडत आहे. अनुकृतीला स्पोर्ट्समध्ये देखील रुची आहे. 19 वर्षांची अनुकृती मिस इंडिया 2018 चा किताब जिंकून इतिहास रचणार आहे.