मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी आभिनेता अक्षय कुमारचं वेळापत्रक सध्या कमालीचं व्यस्त आहे. 'गुड न्यूज' चित्रपटाच्या माध्यमातून तो अभिनेत्री करिना कपूर खानसोबत झळकणार आहे. शिवाय 'सूर्यवंशी', 'लक्ष्मीबॉम्ब' आणि 'बच्चन पांडे' या चित्रपटांनंतर तो 'पृथ्वीराज' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आहे. या चित्रपटात तो मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सोबत भूमिका साकारणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चक्क ३५ भव्य सेटची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये या ऐतिहासिक सेटची निर्मिती होणार आहे. 'पृथ्वीराज महाकाव्या' भोवती चित्रपटाची कथा फिरताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 


तर खुद्द अक्षय त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. 'पृथ्वीराज' चित्रपट २०२० मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. अक्षय चित्रपटात अक्षय पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेला न्याय देणार आहे तर मानुषी त्यांची प्रेयसी संयोगिताच्या भूमिकेत झळकणार आहे. 


चीनमधील सान्या येथे मिस वर्ल्ड २०१७ ही स्पर्धा रंगली होती. तेव्हा मानुषीला जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे ? असा प्रश्न विचारण्यात आला. 


तेव्हा तिने माझ्या मते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. असे उत्तर दिले होते. रॅम्पवर आपलं नशिबाचा डाव आजमावल्यां नंतर ती आता अभिनयात सक्रिय होणार आहे.