`मिसिंग` ट्रेलर रिलीज : १८ वर्षांनंतर मनोज वाजपेयी आणि तब्बू एकत्र
मुंबई : खूप मोठ्या काळानंतर मनोज वाजपेयी आणि तब्बू मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. शुक्रवारी यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा ट्रेलर पाहून सस्पेन्स आणि सायकोलॉजी थ्रिलर असेलेल्या 'मिसिंग' सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. इथे तब्बू आणि मनोज आपली ३ वर्षाची मुलगी तितलीच्या शोधात दिसत आहेत. मुकुल अभ्यंकरने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून ६ एप्रिल २०१८ ला रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या व्यक्तिरेखा
या सिनेमात मनोज आमि तब्बू यांच्याव्यतिरिक्त अनु कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमात अनु कपूर इन्व्हेस्टिंग ऑफिसरची भूमिका करतोय. जो मनोज आणि तब्बू यांची हरवलेली मुलगी शोधून देण्यास मदत करतो. अनू कपूर याआधी जॉली एलएलबी २ मध्ये वकिलाची भूमिका करताना दिसला होता.
१८ वर्षांनतर एकत्र
तब्बू आणि मनोजने २००० साली 'दिल पे मत मार' आणि 'घात'मध्ये एकत्र काम केलं. दर्शकांनाही ही जोडी खूप आवडली. मनोज हा नुकत्याच आलेल्या अय्यारी सिनेमात दिसला होता. तर तब्बू 'गोलमाल अगेन' मध्ये दिसली होती.