मुंबई : काही मोजक्या पण तितक्याच प्रभावी भूमिका साकारणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींच्या यादीत येणाऱ्या एका अभिनेत्रीने अत्यंत विचित्र अशा प्रसंगाचं कथन केलं आहे. आपल्यासोबत झालेल्या कास्टींग काऊचविषयी तिने खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉक्स ऑफिसवर सध्या चांगल्याच गाजणाऱ्या चित्रपटातील या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत ठराविक धाटणीच्या भूमिका निवडल्या आणि त्यांना न्यायही दिला. पण, याच कलाविश्वात तिला अशा प्रसंगाचा सामना करावा लागला होता, जो ती आजपर्यंत विसरु शकलेली नाही. 


पिंकव्हिलाशी संवाद साधताना दिलेल्या माहितीत 'त्या' प्रसंगाविषयी सांगणारी अभिनेत्री आहे, विद्या बालन. ...तर आपणही कास्टिंग काऊचचा शिकार झालोच असतो, अशा शब्दांत त्या प्रसंगाची माहिती तिने दिल्याचं म्हटलं जात आहे.


'मला आठवतंय, मी चेन्नईमध्ये होते. त्याचवेळी हा दिग्दर्शक माझ्याकडे आला. मी त्याला एखाद्या कॉफी शॉपमध्ये जाऊन बोलूया असं सांगितलं. पण, तो वारंवार माझ्या रुमवर येऊन बोलण्यासच सांगत होता. त्यावेळी मग मी माझ्या रुमचं दार खुलंच ठेवलं होतं. तो पाचव्या मिनिटाला रुममधून बाहेर गेला', असं विद्या म्हणाली. दिग्दर्शकाचे मुनसुबे तिने ओळखले होते, पण परिस्थिती बिघडण्यास वेळ लागला नसता या वास्तवाचीही तिला जाण होती. 



कलाविश्वात अशी वागणून विद्याला त्यानंतरही मिळाली, जेव्हा तिला वेशभूषा किंवा मग संवादांच्या बाबतीच अडचणीत आणलं गेलं होतं. कास्टींग काऊचविषयी बोलण्याची विद्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा तिने याविषयीचं मत मांडलं होतं.