Mission Raniganj Trends No. 1 on Netfilx: सध्या 2023 हे वर्षे संपायला आलं आहे. त्यामुळे तुम्हीही यावर्षीचे सर्वात गाजलेले चित्रपट, जे तुमचे पाहायचे राहून गेले असतील, ते तुम्ही पाहणार असालच. तुमच्या लिस्टमध्ये या चित्रपटाचा नक्की समावेश करा. यावेळी हा चित्रपटात भारतात नेटफ्लिक्सवर नंबर 1 स्थानावर आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' हा भारतात नेटफ्लिक्सवर नंबर 1 आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 व्या क्रमांकावर आहे. कोळसा खाणीतील बचाव मोहिमेवर आधारित हा चित्रपट आहे. ज्याची यावर्षी जोरात चर्चा होती. परिणीती चोप्रा, अक्षय कुमार यांची या चित्रपटात महत्त्वपुर्ण भुमिका आहे. या मोहिमेचं नेतृत्व जसवंत सिंह यांनी केले होते. ही घटना 1989 मध्ये रानीगंज येथे घडली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 ऑक्टोबर 2023 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांनी सुद्धा या चित्रपटासाठी चित्रपटगृहात गर्दी केली होती. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट बराच गाजला होता. हा चित्रपट त्यानंतर 1 डिसेंबर 2023 ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले असून हा चित्रपट नंबर वन ठरला आहे. 


परिणिती चोप्रा, अक्षय कुमारसह कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, रवि किशन, वरूण बडोला, दिब्येंदु भट्टाचार्य, राजेश शर्मा, विरेंद्र सक्सेना, शिशिर शर्मा, अनंत महादेवन, जमील खान, सुधीर पांडे, बचन पचेरा, मुकेश भट्ट आणि ओमकार दास मानिकपुरी यांच्यासारखे हरहुन्नरी कलाकार या चित्रपटात होते. वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, अजय कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून टीनू सुरेश देसाई यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  


हेही वाचा : तृप्ती डिमरी-रणबीर कपूरचा बोल्ड सीन पाहून अस्वस्थ झाला चित्रपटातील सहकलाकार; म्हणाला, ''माणसाची विकृती...'


भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनी या रेस्क्यू ड्रामाला पसंती दर्शवली आहे. एका लोकप्रिय मनोरंजन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, यावेळी अक्षय कुमारचा हा चित्रपट ओटीटीवरील सर्वाधिक पसंती मिळवलेली चित्रपट ठरला आहे. टॉप 10 मध्ये हा चित्रपट नंबर वनवर आहे. हा चित्रपट सध्या 12 देशांमध्ये ट्रेण्ड होतो आहे. यातून हेच समजते की अक्षय कुमारचा हा चित्रपट सध्या ओटीटीवर जोरात ट्रेण्ड होतो आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे.