मुंबई : झगमगत्या विश्वाकडे आपण प्रत्येक जण मोठ्या आकर्षणाने पाहत असतो. ग्लॅमरच्या दुनियेत हरवलेल्या सेलिब्रिटींना करियरच्या वाट्यावर अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यांतील एक म्हणजे 'कास्टिंग काऊच'. आजपर्यंत अनेक अभिनेत्रींंनी त्यांच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा अनुभव निडरपणे सांगितला.  'कास्टिंग काऊच' म्हणजे झगमगत्या विश्वातील काळं सत्य.  'कास्टिंग काऊच'चा सामना फक्त सामान्य मुलींनाच नाही तर, सेलिब्रिटींच्या सुनांनीही केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुपमा मालिकेमध्ये काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदलसा शर्माचं नाव या यादीमध्ये जोडण्यात आलं आहे. मदलसा ही बॉलिवूड स्टार मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. मदलसा देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे. याबाबत तिने स्वत: एका मुलाखती दरम्यान आपलं दु:ख व्यक्त केलं. इतकच नाही तर यापासून कसं दूर राहायचं याचा सल्लाही तिने दिला आहे. 



मदालसा शर्माने कास्टिंग काउचबाबत मोठा खुलासा केला. एका वेब पोर्टलशी बोलताना मदलसा शर्मा म्हणाली, आजच्या काळात मुलगाच नाही तर मुलगी असणे हे दोन्ही खूप धोकादायक आहेत. तुम्ही कॉर्पोरेट जगात गेलात तर तिथे पुरुषांनी वेढलेली एक मुलगी आहे. काही लोक तुमच्यामध्ये इंट्रेस्ट दाखवतात. तुमच्या हातात आहे. लोकांना जरी तुम्ही आवडत असलात तरीही तुम्ही वाईट लोकांपासून लांब राहाणं हे तुमच्याच हातात आहे. 


चांगलं आणि वाईट दोन्ही सोबत असतं पण तुमच्या मर्जीवर हे अवलंबून आहे तुम्ही कोणत्या बाजूने जाताय किंवा कोणाची साथ देत आहात. लोक तुमचे कान भरू शकतात तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करतील. मात्र तुमची मर्जी तुमची इच्छा बदलू शकत नाहीत. 'मी देखील अशी घटनांचा सामना मोठ्या धैर्यानं केला आहे. बऱ्याचदा मला मिटिंगमध्ये ऑकवर्ड वाटेल असे लोक वागायचे. मी अशा लोकांकडे सरळ दुर्लक्ष केलं. तिथून दुर्लक्ष करून निघून गेले.'


'मला तिथून उठून जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. कोणामध्ये एवढी हिंमत नाही. मी इथे अभिनेत्री म्हणून आले आहे. मी माझं काम करते आणि तिथून निघून जाते. मला माझं आयुष्य कशा पद्धतीनं डील करायचं हे मी ठरवलं पाहिजे. इतर कोणीही नाही. हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. कोणीही तुमच्या आयुष्यावर हक्क दाखवू शकत नाही'