मुंबई :  साऊथ मुव्ही स्टार  सामंथा- नागा चैतन्य यांच्या घटस्फोटानंतर आणखी एक सेलिब्रिटी कपल वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.गेल्या काही महिन्यांपासून किम कार्दशियनच्या आयुष्यात बरेच चढ-उतार आले आहेत. किमने तिचा पती कान्ये वेस्टपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून त्यानंतर ती अनेक ठिकाणी पीट डेव्हिडसनसोबत दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तिच्या नावातून 'वेस्ट' हटवून किमने या नात्यापासून पूर्णपणे दूर व्हायचे असल्याचे संकेत दिले आहेत. या घटनेच्या काही तास आधी कान्येने किमला तिच्या आयुष्यात परत येऊ देण्याची विनंती केली.किम डेव्हिडसनला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.


नवीन कपल अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटताना दिसले आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होताना दिसत आहेत. दोघांना अधिकृत कपल मानले जात आहे.



किमने स्वत:ला अविवाहित राहण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली आहे. जेणेकरून तिचे नाव पुन्हा आधीप्रमाणे असेल. किमने नुकतीच कायदेशीर कागदपत्रे दाखल केली आहेत. जर न्यायाधीशांनी त्यांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली तर किमने घटस्फोट घेतल्याचं अधिकृतरित्या जाहीर होईल.



किम कार्दशियनने तिच्या मुलांच्या ताब्यात आणि मालमत्तेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच तिच्या नावावरून वेस्टला अधिकृतपणे काढून टाकण्यासाठी लॉरा वासरला तिचा वकील म्हणून नियुक्त केले आहे. कान्येने तिला तिच्या आयुष्यात परत येऊ देण्याची विनंती केल्यानंतर किमने तिच्या आडनावावरून 'वेस्ट' काढून टाकले. रॅपर कान्येने अजूनही किमसोबत वेगळे होण्यास नकार दिला आहे.