टेप वस्तू पॅकींग करण्यासाठी वापरतात... तिने त्याच्यापासूनच कपडेच बनवले
आता हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.
मुंबई : बरं, फॅशन ही एक अद्भुत गोष्ट आहे. त्याची एका सवय लागली, की माणूस सतत काहीतरी नवीन शोधत राहतो, असं बोललं जातं. किम कार्दशियनची अनेकदा तिच्या फॅशनमुळे चर्चा होते.
अनेकदा ती स्वतःच्या फॅशनमध्ये प्रयोग करताना दिसतेआणि यावेळी तिने स्वतःला टेपमध्ये गुंडाळले आहे.
किम कार्दशियन अलीकडेच पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती, जिथे तिने स्वत:ला टेपमध्ये गुंडाळलं होतं. त्यावेळी किम कार्दशियनला ज्याने पाहिलं, तो तिला पाहतच राहिला.तिच्याकडे असलेली बॅगही टेपने झाकलेली होती.
किम कार्दशियनने तयार होतानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बॉडी फिटेड ब्लॅक आउटफिट परिधान करताना दिसत आहे. आणि तिने स्वत:ला टेपमध्ये गुंडाळले आहे.
तिचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.