नवी दिल्ली : अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी, लेखिका, अभिनेत्री आणि प्रसिद्ध मूळ भारतीय मॉडल पद्मलक्ष्मी यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. 16 व्या वर्षी आपल्यासोबत बलात्कार झाला होता, असा खुलासा लेखक सलमान रश्दी यांची पूर्व पत्नी पद्मलक्ष्मी यांनी केलाय. आपल्यासोबत घडलेल्या या घटनेला जगासमोर आणत महिला आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक छळांवर का गप्प राहतात, यावर उजेड टाकलाय.


23 वर्षांच्या तरुणाकडून बलात्कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी 16 वर्षांची असताना एका तरुणाला डेट करत होते... तो माझ्या कॉलेजमध्ये होता आणि मला तो हँडसम-चार्मिंग वाटत होता... तो 23 वर्षांचा होता... आमची भेट लॉस एन्जेलिसच्या एका मॉलमध्ये झाली होती. मी तिथं शाळेनंतर काम करत होते, असं पद्मलक्ष्मी यांनी म्हटलंय.


ना दारू, ना छोटे कपडे...


त्यानं काही वेळ माझ्याशी फ्लर्ट केला... त्यानंतर काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर मी त्याच्यासोबत 31 डिसेंबरच्या एका पार्टीला गेले होते... थकल्यामुळे मी त्याच्याच अपार्टमेंटमध्ये आराम करण्यासाठी गेले... याचवेळी माझ्यावर त्यानं बलात्कार केला. आता तुम्हाला त्यावेळी मी दारू प्यायले होते का? किंवा मी काय परिधान केलं होतं? हे जाणून घ्यायचं असेल... भले या प्रश्नांना काहीही अर्थ नाही पण मी हे स्पष्ट करू इच्छिते की त्या दिवशी ना मी दारू प्यायले होते... ना छोटे कपडे परिधान केले होते, असं पद्मलक्ष्मीनं यात म्हटलंय. 


मला केवळ एवढंच आठवतंय की मी जेव्हा उठले तेव्हा माझ्या पायांच्या मधोमध खूप दुखत होतं... जसं एखाद्यानं चाकूनं वार केलेत... तो माझ्यावर पहुडला होता... हे तू काय करतोय? असं जेव्हा मी ओरडून त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला 'केवळ थोडा त्रास होईल'... मी खूप ओरडले त्याच्या विनंत्या केल्या... पण ना माझा त्रास कमी झाला ना अश्रू...



कुणालाही सांगू शकले नाही कारण...


पण मी हे कुणालाच सांगू शकले नाही... आई, मित्र-मैत्रिणी किंवा पोलिसांनाही मी हे सांगू शकत नव्हते... कारण या घटनेचा मला जोरदार मानसिक धक्का बसला होता... 1980 मध्ये डेट रेप सारखी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता... डेट रेप म्हणजे तुमच्यावर अशा व्यक्तीनं बलात्कार केलाय ज्याला तुम्ही अगोदरपासून ओळखताय... जर ही गोष्ट आपण कुणाला सांगितली तर लोकांनी मलाच प्रश्न केले असते की मी त्या मुलाच्या अपार्टमेंटमध्ये काय करत होते? पण ही माझी चूक होती, असंही पद्मलक्ष्मी यांनी म्हटलंय.