Urfi Javed Topless Walk: सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री, मॉडेल आणि रिअॅलिटी स्टार उर्फी जावेद हिचं नाव घेतलं की, आता काय नवीन? असाच सूर अनेकजण आळवतात. उर्फी आणि तिचा फॅशन सेन्स, पाहूनच चक्रावायला होतं. मुळात चक्रावण्यापेक्षा ती ज्या आत्मविश्वासानं स्टाईल स्टेटमेंट देते ते पाहता, ही कुणाला घाबरते की नाही हाच प्रश्न अनेकजण विचारताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा एकदा हीच उर्फी एका नव्या व्हिडिओमुळं चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ती टॉपलेस होऊन एका हिरवळीनं बहरलेल्या मैदानात चालताना दिसत आहे. 


निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये पाठीवर मोकळे केस सोडून उर्फी चालताना दिसत आहे. उर्फी टॉपलेस होत चालताना पाहून अनेकांना धक्का बसतो, तोच ती मागे वळून पुन्हा सर्वांनाच थक्क करताना दिसत आहे. 


कारण, उर्फी टॉपलेस असल्याचा अंदाज तुम्ही बांधत असतानाच तिनं निळ्या रंगाचे इनरवेअर घातल्याचं लक्षात येत आहे. We making the noise ! असं कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Uorfi (@urf7i)


वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षीच उर्फी एका रिअॅलिटी शोमुळं प्रकाशझोतात आली. इतकंच नव्हे, तर ती सोशल मीडियावरही कमाल चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. फोटोशूट असो किंवा मग एखादा कार्यक्रम, उर्फी तिथं येणार म्हटलं की सर्व नजरा तिच्याच येण्यावर खिळतात.