`पती फक्त मुलांना जन्म देण्यासाठी, रोमांससाठी मात्र बॉयफ्रेंड...`, बापरे कोण म्हणतंय असं ?
मॉडेलचं खासगी आयुष्य अखेर समोर, पती असतानाही, बॉयफ्रेंडसोबत संबंध कारण...
मुंबई : लग्नानंतर देखील अनेकांचे परक्या व्यक्तीसोबत संबंध असतात. पण या मॉडेलच्या विवाहबाह्य नात्याबद्दल तिच्या पतीला देखील माहिती आहे. मॉडेल म्हणते, 'मी ओपन रिलेशनशिपमध्ये आहे... ज्यामुळे बॉयफ्रेंडसोबत असलेल्या नात्याला माझ्या पतीचा विरोध नाही...' या मॉडेलने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. मुलांना जन्म देण्यासाठी पती, तर रोमांस आणि आयुष्याचा आनंद घेण्यासाठी बॉयफ्रेंड असल्याचं तिने सांगितलं.
या मॉडेलचं नाव आहे, डेजी... एक ब्रिटीश वेबसाईट डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत डेजी म्हणाली, 'ती आणि पती एका ओपन रिलेशनशीपमध्ये आहेत, ओपन रिलेशन म्हणजे दोघं देखील दुसऱ्या व्यक्तीसोबत रोमांस करू शकतात... महत्त्वाचं म्हणजे ही फसवणूक नसते...'
एवढंच नाही तर डेजी म्हणते, तिचा पती एसेक्शूअल आहे. यामुळे ती कायम तिच्या बॉयफ्रेंडसोबत वेळ व्यतीत करते. डेजी दोन मुलांची आई आहे. ती आता लवकरचं तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.
'पती-पत्नी और वो..' एकाचं कुटुंबात
डेजीची गोष्ट वेगळी आहे. पण ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या थ्रुपल कपलची चर्चा सोशल मीडियावर कायम रंगत असते. 'पती-पत्नी और वो..' महत्त्वाचं म्हणजे तिघे एकाचं कुटुंबात प्रेमात राहतात.
टॉम हिलयार्ड, त्याची पत्नी लेजली आणि गर्लफ्रेंड एम्मा कूंबर एकाच घरात राहतात. टॉम एकदा त्यांच्या नात्यात आणखी एका महिलेचा समावेश करण्याबद्दल गंमतीत बोलला होता. तेव्हापासून तिने एकत्र राहतात.
गेल्या दोन वर्षांपासून दोघे एकत्र राहतात. आता लेजलीला देखील एम्मासोबत प्रेम झालं आहे. तिघे घरी एकत्र राहतात. शिवाय बिल देखील एकत्र शेयर करतात. लेजली म्हणते, 'आम्ही तिघेही एकमेकांवर प्रेम करतो. इतर कोणत्याही जोडप्याप्रमाणेच. फरक एवढाच की आपण तिघेजण आहोत.'