मुंबई :  प्रेम म्हणजे अशी भानवा जी फक्त आपण अनभवू शकतो. पण एक मॉडेल अशी आहे, जी प्रियकरांसोबत डेटला जाण्याआधी त्यांची परीक्षा घेते. पहिल्या डेटला ती मुलांची  IQ टेस्ट घेते.  जर मुलगा टेस्टमध्ये अपयशी ठरला, तर ती दुसऱ्यांदा त्या मुलासोबत डेटवर जात नाही. उत्तम जोडीदाराच्या शोधात असलेल्या या मॉडेलचं नाव कँडिस क्लॉस असं आहे. कँडिस अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील नागरिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कँडिस गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त प्रियकराच्या निवडीबद्दल आणि बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. कँडिस म्हणाली, 'माझ्या या निर्णयामुळे पुरुष मला भयानक समजतात..'


एवढंच नाही तर, उत्तम जोडीदाराच्या शोधात ती कोणत्याही  थरावर जाऊ शकते. सध्या तिचं हे वक्तव्य सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कँडिस म्हणते, 'मी कायम लक्षात ठेवते दुसऱ्या डेटला जात असताना मुलाची योग्य निवड करते...'



मॉडेल पुढे म्हणते, 'मुलं दिसताना स्मार्ट दिसतात, पण त्यांच्यामध्ये चालाकी नसेल तर त्यांची सुंदरता काही कामाची नाही. मला असा जोडीदार हवा आहे, जो मला समजून घेईल...' असं देखील कँडिस म्हणाली. 


IQ चाचणी उत्तीर्ण झालेल्यांसाठी देखील एक नियम आहे. म्हणजेच, मुलगा चालू घडामोडींमध्ये अद्ययावत असावा आणि तो गणित, आर्थिक आणि विज्ञानाच्या ज्ञानाद्वारे मॉडेलचे मनोरंजन करू शकेल. पण कँडिस खुद्द एक ड्रापआऊट आहे. 


पण कँडिस दावा करते की मेन्सा मानकांनुसार ती हुशार आहे. तिच्या मते IQ स्केलनुसार, 120-140 गुण मिळवणारे लोक खूप हुशार असतात. तर 140 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांना प्रतिभावान मानले जाते.