`या` अभिनेत्रींचे फोटो पाहून आई म्हणाली हे ताबडतोब थांबवा.. ती वयाने लहान...
सोशल मीडियावर रीवाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Actress Riva Arora: या अभिनेत्रीने सगळ्यांच लक्ष स्वत:वर वेधून घेतले आहे. आजकाल ही बाल अभिनेत्री रिवा अरोरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप चर्चेत आहे. 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' (Uri: The Surgical Strike) या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना चकित करणाऱ्या रिवाने स्वतःच्या नवीन लूकने सर्वांनाच चकित केले आहे. सोशल मीडियावर रीवाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, काही व्हिडिओंना प्रेक्षकांची पसंती मिळते तर काहीजण तिला ट्रोल देखील करतात. ज्यामुळे तिला आणि तिच्या पालकांना नेहमीच त्यांच्यावर होणाऱ्या टीकांना समोरे जावे लागते. त्याचवेळी करण कुंद्रा आणि मिका सिंगसोबतच्या त्यांच्या व्हिडिओवरही बरीच टीका होत आहे. या सगळ्यात आता रीवाच्या आईने पहिल्यांदाच आपली बाजू उघडपणे सर्वांसमोर मांडली आहे. (mom says stop this immediately after seeing the photos of riva arora nz)
हे ही वाचा - Malaika Arora Birthday : मलायकाच्या वाढदिवसानिमित्त 'हा' धक्कादायक किस्सा आला समोर, जाणून घ्या
रिवा अरोराच्या ग्लॅमरस व्हिडिओवरून खळबळ माजल्यानंतर आता तिची आई निशा अरोराने तिची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये रीवाचे वयही उघड केले आहे. निशाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, "मी शांत होते, पण आता नाही. माझ्या मुलीच्या वयावरील आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि मीडिया रिपोर्ट्स पूर्णपणे खोटे आणि निराशाजनक माहिती देत आहे. अशी माहिती लिहिण्यापूर्वी तुम्ही किमान उलट तपासणी केली पाहिजे. माझी मुलगी एक अभिनेत्री आहे आणि अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे.
हे ही वाचा - शाहरुख खानच्या बायकोने केले कतरिना कैफच्या घराचे मेकओव्हर... पाहून व्हाल थक्क..
निशा इंडिया फोरमशीही बोलली आणि म्हणाली, 'हे दुर्दैवी आहे की कोणत्याही पडताळणीशिवाय एका तरुण मुलीबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. माझी मुलगी आता दहावीत आहे. ती 13 वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम करत आहे, तिने सर्व काही पूर्ण प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने मिळवले आहे. मात्र, निशाच्या म्हणण्यानुसार, रीवा 12 वर्षांची नसून त्याहूनही मोठी आहे.