Monica Bedi In Relationship With Abu Salem : अभिनेत्री मोनिका बेदी (Monica Bedi) ही पंजाबच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. मोनिकानं 'ताजमहाल' या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मोनिकानं त्यानंतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या 'सुरक्षा' या चित्रपटातून मोनिकानं पदार्पण केलं आहे. यानंतर मोनिकानं गोविंदासोबत देखील काम केले. मोनिका ही कधीच थांबली नाही. तिनं एकामागे-एक असे अनेक प्रोजेक्ट्स केले. पण तुम्हाला माहितीये का? अचानक तिच्या आयुष्यात प्रेम आलं आणि त्यानंतर तिचं अभिनय क्षेत्रातील करिअर संपूष्टात आलं. म्हणायचं झालं तर तिचा आणि बॉलिवूडचा संपर्क तुटला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनिकानं अभिनय क्षेत्राला राम-राम करण्याचं कारण D गॅंग होती. एककाळ असा होता जेव्हा दाउद इब्राहिम, अबू सालेम, छोटा राजन, हाजी मस्तान आणि करीम लाला यांना मुंबईत सगळेच घाबरायचे. त्या सगळ्यांना अनेकवेळा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये स्पॉट करण्यात आले. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. अशाच एका पार्टीत मोनिकाची भेट D गॅंग च्या एका मेंमरशी झाली होती. 1998 साली दुबईतील एका पार्टीत अबू सालेमनं मोनिकाला पहिल्यांदा पाहिलं होतं. तिला पाहताच क्षणी अबू सालेम तिच्या प्रेमात वेडा झाला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पार्टीनंतर अबू सालेमनं नाव बदलून तो एक बिझनेसमॅन असल्याचे फोनवर सांगितले. मोनिका आणि अबू सालेम हे नंतर एकमेकांशी फोनवर सतत बोलू लागले. हळूहळू मोनिकाचा विश्वास अबू सालेमनं जिंकला आणि मोनिका त्याला तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगू लागली. मोनिका नेहमीच अबूच्या फोनची वाट पाहायची. दरम्यान, एका मुलाखतीत मोनिकानं खुलासा केला होता की तिला कधी वाटलं नव्हतं की कोणत्या व्यक्तीशी फक्त फोनवर बोलत-बोलत ती व्यक्ती तिला इतकी आवडू लागेल की त्याय व्यक्तीशी बोलल्याशिवाय तिला राहवत नाही. 


मोनिका त्यानंतर दुबईला गेली तेव्हा अबूनं त्याचं खरं नावं तिला सांगितलं. पण त्यावेळी तिला तो डॉन आहे या माहितीविषयी काही वाटतं नव्हतं, कारण तिचं त्याच्यावर प्रेम होतं. अबू तिची खूप काळजी करायचा, तिच्यावर प्रेम करायचा. दरम्यान, जेव्हा पोलिस अबूच्या मागे लागले तेव्हा त्यांनी दुबई सोडत अमेरिकाला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मोनिका अबूसोबत राहू लागली. त्यावेळी मोनिका अबूसाठी जेवण बनवण्यापासून, भांडी ते कपडे धुण्यापर्यंत घरातील सगळी कामं करू लागली. 


हेही वाचा : तुम्हाला माहितीये का? Jeetendra यांनी पहिल्या चित्रपटात केली महिलेची भूमिका


दरम्यान, फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत मोनिकानं सांगितलं की पोर्तुगालला पोहोचल्यानंतर तिला अबू सालेमविषयी सगळ्यागोष्टी कळल्या. मोनिकाला जेव्हा कळलं की मुंबईत झालेल्या ब्लास्टमध्ये अबू सालेम शामिल आहे तेव्हा तिला खूप मोठा धक्काबसला होता. तर दुसरीकडे पोर्तुगाल पोलिसांनी त्यांना खोटे कागदपत्रांवरून त्यांच्या देशात प्रवेश दिला नव्हता. तर त्या दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यांची नंतर सुटका झाली पण मोनिकाचं फिल्मी करिअर संपलं होतं.