मुंबई : 'बावरा मन देखने चला एक सपना'  आणि हे स्वप्न आणखीन कुणी नाही तर मौनी रॉय बघत आहे. मौनी रॉयने तिच्या मादक परफॉर्मन्ससह जबरदस्त डान्स स्टेप करतानाचा एक व्हिडिओ शूट केला आहे आणि तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मौनी रॉयच्या या डान्स व्हिडिओने सगळ्यांचे लक्षवेधून घेतले आहे.  गोड हास्याने सौंदर्यावती मौनी रॉय पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करताना दिसत आहे.


या व्हिडिओतील मौनी रॉयच्या लूकबद्दल बोलताना, अभिनेत्रीने साधा मेकअप आणि गोल्डन कलरचा गाऊन परिधान केला आहे, तसेच डिझाईनर ज्वेलरी सुद्धा या लूकसोबत मॅच करण्यात आली आहे.


जेव्हापासून मौनी रॉयने हा व्हिडिओ शेअर केला आहे, तेव्हापासून या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मौनी रॉय सध्या तिच्या सोशल मीडियावर नवनवीन डान्स व्हिडिओ शेअर करताना दिसते. लग्नानंतर मौनीने कामाला सुरुवात केली आहे. ती सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चेत असते.