मुंबई : टीव्ही ते बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय लवकरच नववधू बनणार आहे. हे तिच्या कोणत्याही चित्रपटातील भूमिकेबद्दल नाही, तर खरंच मौनी रॉय तिच्या बॉयफ्रेंडसोबत सात फेरे घेणार आहे. तेही याच महिन्यात जानेवारीत. लग्नासाठी दोघांनी गोव्यात हॉटेलही बुक केले आहे. जाणून घ्या मौनीच्या स्वप्नांचा राजकुमार कोण आहे आणि तिच्या लग्नाच्या तयारीबद्दल.


२७ जानेवारीला रॉयल वेडिंग 



2022 मध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सच्या लग्नाची लोक वाट पाहत आहेत. याची सुरुवात मौनी रॉयच्या लग्नापासून होणार आहे. अभिनेत्री मौनी रॉय येत्या 27 तारखेला तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत 7 फेरे घेणार आहे. हे लग्न गोव्यातील एका 5 स्टार हॉटेलमध्ये होणार आहे.


एका सूत्राने सांगितले की, मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी लग्नासाठी गोव्यात 5 स्टार हॉटेल बुक केले आहे. पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. सूत्राने असेही सांगितले की मौनी रॉय आणि सूरज यांनी त्यांच्या पाहुण्यांना ही बातमी मीडियाला लीक करू नका. लग्नाच्या दिवसापर्यंत शांत राहण्यास सांगितले आहे.



कोण आहे मौनी रॉयचा राजकुमार 


अभिनेत्री मौनी रॉयचा भावी पती सूरज दुबईत राहतो. तो एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. सूरज मूळचा भारताचा आहे. काही काळापूर्वी मौनी आणि सूरज यांची भेट झाली, त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.